कोल्हापूर : बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष. बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही त्यामुळे काळजी वाटत असते. विशेषकरून बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना. आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, ही पालकांची अपेक्षा असते. त्यासाठी केवळ अभ्यासच नाही, तर परीक्षांचे स्वरूप ओळखून तयारी करणे गरजेचे आहे.या वर्षीपासून अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश ‘सीईटी’च्या आधारावर होणार आहेत. परीक्षांमध्ये झालेले हे बदलानुरूप अभ्यासतंत्र आणि पालक-विद्यार्थ्यांना याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे व उएळ रूङ्म१ी इङ्मङ्म२३ी१ आणि विद्यालंकार यांच्या सौजन्याने ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला सेमिनार हा उद्या, रविवारी सायंकाळी साडेचार वाजता आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन, महावीर कॉलेजशेजारी, नागाळा पार्क येथे होणार आहे.या सेमिनारमध्ये बारावी सायन्सचे विद्यार्थी व पालकांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे व मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळणार आहे. जसे ‘सीईटी’ची तयारी कशी करायची, तिचे स्वरूप कसे असणार, बोर्ड आणि ‘सीईटी’च्या अभ्यासाचा ताळमेळ कसा राखायचा, यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना असू शकतात. ऌरउ+ उएळ दोहोंचाही पूरक अभ्यास कसा करायचा, याचे तंत्र तज्ज्ञांकडून जाणून घेण्याची नामी संधी ऌरउ + उएळ यशाचा फॉर्म्युला सेमिनारमध्ये मिळणार आहे.मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जेईई मेन्स व अॅडव्हान्स या आधारेच अभियांत्रिकीचे प्रवेश दिले जाऊ लागले होते. त्यानुसार विद्यार्थी अभ्यास करू लागले. मात्र, यंदा पुन्हा ‘सीईटी’च्या आधारावरच अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखांचे प्रवेश दिले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास पद्धतीत थोडे बदल करावे लागणार आहेत. ते नीट समजावून सांगण्यासाठी ‘लोकमत’ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.ढँ८२्रू२, उँीे्र२३१८, ठ४ेी१्रूं’२ झटपट कशी सोडवावी, उरलेल्या मोजक्या दिवसांत बारावी (सायन्स) आणि उएळ ढँ८२्रू२, उँीे्र२३१८, ठ४ेी१्रूं’२चा अभ्यास कसा बॅलन्स करावा? बारावी (सायन्स) पेपर कसे लिहावेत? ‘सीईटी’चे प्रश्न क्षणात सोडविण्याच्या टिप्स आणि ट्रिक्सही विद्यार्थ्यांना सेमिनारमध्ये जाणून घेता येणार आहेत. त्यामुळे बारावी सायन्सचे सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सेमिनारमध्ये नोंदणी करावी. कार्यक्रमस्थळी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. (प्रतिनिधी)डिस्काऊंट कुपनसेमिनारमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना ‘विद्यालंकार’तर्फे दोन हजार रुपयांचे डिस्काऊंट कुपन देण्यात येणार आहे. सेमिनारमध्ये जागा आरक्षित करण्यासाठी ७७९८३४४७४४, ८६००३७२२०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
बारावी सायन्सच्या विद्यार्थी, पालकांसाठी उद्या सेमिनार
By admin | Published: January 01, 2016 11:37 PM