कोल्हापूर: आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना -भाजपमध्ये युती होणारच आहे, सध्या सुरु असलेली भांडणे ही लुटुपूटूची असून फारसे गांभिर्याने घेण्यासारखे नाही, अशी टिप्पणी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार बैठकीत केली. शिवसंग्राम भाजपसोबतच निवडणूक लढवणार आहे. जागा वाटपाची अनौपचारीक चर्चा झाली असून ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात चित्र स्पष्ट होणार आहे, असेही मेटे यांनी स्पष्ट केले.खासगी कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या आमदार मेटे यांनी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. मेटे म्हणाले, २0१४ च्या लोकसभा निवडणूकीपर्यंत शिवसंग्राम हा सामाजिक पक्ष होता, त्यानंतर तो राजकीय झाला आहे. पक्षाकडे एक आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत सदस्य अशी सत्तास्थाने आहेत. आगामी निवडणूकही लढवणार आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत जागावाटपासंदर्भात अनौपचारीक चर्चा झाली आहे.
लोकसभेची एक आणि उर्वरीत विधानसभेच्या जागासंदर्भात लवकरच बैठक होणार आहे. भाजपनेही सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. येत्या ९ फेब्रुवारीला पक्षातर्फे औरंगाबादमध्ये निर्धार मेळावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार रामदास आठवले, शिवसेना आमदार चंद्रकांत खैरे हे उपस्थित राहणार आहेत.मेळाव्यात शेतकरी व शेतमजूर यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळावी म्हणून राज्यभरातील ५ लाख शेतकºयांकडून भरुन घेतलेले अर्ज सादर करुन पेन्शनची मागणी केली जाणार आहे. याशिवाय सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी द्यावी, व्यवसायासाठी भांडवल द्यावे अन्यथा दरमहा पाच हजारप्रमाणे भत्ता द्यावा अशा मागणीचा ठराव केला जाणार आहे.बुलढाणा जिल्ह्याला राजमाता जिजाउंचे नाव द्याबुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे राजमाता जिजाउ यांचे जन्मगाव आहे. स्वराज्य उभारणाºया शिवाजी महाराजांच्या मातोश्री नाव बुलढाण्याला द्यावे यासाठी शिवसंग्राम आग्रही राहणार आहे. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी मागे पुढे पाहणार नाही, असेही मेटे यांनी सांगितले.