कोल्हापूर : निधी मंजूर असून, तो लवकरच दिला जाईल; पण यातील कधी १५ लाख, तर कधी ३५ लाख रुपयांच्या मागणीचे पत्र पाठवा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुणे, मुंबई कार्यालयांतून दूरध्वनीवरून तोंडी स्वरूपात शिवाजी विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधीबाबत मिळत आहेत; पण प्रत्यक्षात पुढे काही कार्यवाहीच होत नाही. सुवर्णमहोत्सवी निधीतील एकूण रकमेपैकी सन २०१४-१५ साठी शासनाकडून १३ कोटी ६९ लाख ६१ हजार रुपये मिळण्याच्या प्रतीक्षेत विद्यापीठाचे वर्ष सरले.पालकमंत्र्यांनी जोर वाढवावाविद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या १९ जून २०१५ रोजी झालेल्या स्वागतावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुवर्णमहोत्सवी निधीचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. यानंतर ११ दिवसांनी त्यांनी निधीप्रश्नी मुंबईत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत बैठक घेतली. यानंतर पुन्हा मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत १ जुलै २०१५ रोजी झालेल्या बैठकीत सरकारने उर्वरित ४० कोटी ३३ लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतला. यात दरवर्षी पाच ते दहा कोटी रुपये देण्याचा सरकारचा विचार होता; पण त्यापुढे सरकारचे पाऊल पडले नाही.
मागणी पत्र पाठवा; तातडीने निधी देऊ
By admin | Published: March 11, 2016 12:06 AM