अतिशय कठीण आणि खडतर परिस्थितीतून मार्ग काढत सर्वसामान्य जनतेशी राजकीय नाळ जुळवत पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात सहकाराचे जाळे त्यांनी पसरविले. गावागावात आपल्या विचारांशी सहमत लोकांना एकत्र करून विविध सहकारी संस्था स्थापन करून कार्यकर्त्यांना उभारी दिली. आयुष्यभर त्यांनी प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ स्वाभिमानाने राजकारण केले.
भगवानराव सरनोबत यांनी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आसुर्ले-पोर्ले येथे शिक्षण संस्थेची स्थापना केली. नृसिंह सहकारी बँक आणि केंदारलिंग सुतगिरणीची स्थापना केली. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अशा पदावर राहत त्यांनी सामाजिक, राजकीय काम केले. पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत सरकार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या शनिवारी आहे.
२३
भगवानराव सरनोबत सरकार