Kolhapur News: गडहिंग्लजमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या रत्नमाला घाळी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 06:30 PM2023-01-30T18:30:18+5:302023-01-30T18:30:40+5:30
उदया मंगळवारी (३१) येथील आजरा रोडवरील त्यांच्या राहत्या घरी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यर्दशानासाठी ठेवण्यात येणार
राम मगदूम
गडहिंग्लज : येथील काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती रत्नमाला शिवलिंग घाळी (वय ९२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सोमवारी आज, सोमवारी (दि.३०) दुपारी ४ वाजता निधन झाले. गडहिंग्लजनगरीचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार दिवंगत डॉ.एस.एस.घाळी यांच्या त्या पत्नी होत.
उदया मंगळवारी (३१) येथील आजरा रोडवरील त्यांच्या राहत्या घरी सकाळी ७ ते ११ पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यर्दशानासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता येथील बेलबागेतील लिंगायत दफनभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९६२ ते १९७७ पर्यंत त्यांनी गडहिंग्लजच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले. डॉ.घाळी यांच्या पश्चातच त्या सार्वजनिक क्षेत्रात अधिक सक्रीय झाल्या होत्या.त्या अत्यंत सेवाभावी व धार्मिक होत्या.'घाळी वहिनी' या नावानेच त्या सर्वांना परिचित होत्या.
येथील विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा, वीरशैव बँकेच्या अध्यक्षा, गांधीनगर हौसिंग सोसायटीच्या अध्यक्षा, गडहिंग्लज तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा, गडहिंग्लज तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.सतीश घाळी यांच्या त्या काकी होत.