कुरुंदवाड येथे पाण्याच्या प्रचंड वेगाने या केंद्राच्या पाणीमोजणीसाठी उभारण्यात आलेले रोप वेचे दोन्ही टॉवर कोसळून पडले आहेत; तर समडोळी येथेही रोप वे तुटला आहे. तसेच सर्वच केंद्रांच्या परिस्थितीची पाहणी करण्यात आली. शिवाय सर्वच केंद्रांच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. पूरस्थितीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करण्याबरोबर अडचणींवर मात करीत सर्वच केंद्रांचे कामकाज अखंडित ठेवण्यावर भर देण्यात आला. सदर या पथकात अभिषेक गौरव कार्यकारी अभियंता, किसन रावलानी कनिष्ठ अभियंता, रूपेशकुमार यादव कनिष्ठ अभियंता, बोया रमेश कुशल कार्य साहाय्यक, गोपीसिंग कुशल कार्य साहाय्यक, आदींचा समावेश होता. अर्जुनवाड येथे कुशल कार्य साहाय्यक उद्धव मगदूम, रावसाहेब माने, राहुल डोंगरे, योगेश कोळी, गणेश डोंगरे, संताजी मगदूम, आदींनी पथकाचे स्वागत केले.
फोटो - १३०८२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे केंद्रीय जल आयोगाच्या वरिष्ठ पथकाकडून धावती भेट देण्यात आली.