महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रांसह शिक्षणविषयक सुमारे ३५ पुस्तके लिहिली. गडहिंग्लज येथे रात्र शाळा आणि जन्मगावी करंबळी येथे त्यांनी माध्यमिक शाळा सुरू केली.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडील ‘बालभारती’च्या संपादकीय विभागाचे अध्यक्ष, राज्य शासनाच्या महात्मा फुले समग्र वाड:मय पुस्तक निर्मिती समिती आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.
गारगोटी येथील महात्मा जोतिबा फुले विश्वभारती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. राष्ट्रीय पातळीवरील ‘सामाजिक समता’ तर राज्य पातळीवरील ‘दलित मित्र’ पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता. आयुष्यभर त्यांनी सत्यशोधक व पुरोगामी विचारानेच वाटचाल केली.
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता विजय माळी यांचे ते वडील होत.