शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

इचलकरंजीत गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:51 PM

इचलकरंजी : खंडणी, लूटमार, खून, मारामारी, वाटमारी असे गंभीर गुन्हे वारंवार करणाऱ्या परिसरातील पाच टोळ्यांवर इचलकरंजी पोलीस दलाने मोक्का (संघटित गुन्हेगारी) कायद्यानुसार कारवाई केली. आणखीन दोन टोळ्या प्रस्तावित आहेत. या कारवाईमुळे शहर परिसरात पसरलेले गुन्हेगारीचे जाळे उजेडात आले असले तरी गुन्हेगारी क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. पोलिसांचे हे काम स्तुत्यच ...

इचलकरंजी : खंडणी, लूटमार, खून, मारामारी, वाटमारी असे गंभीर गुन्हे वारंवार करणाऱ्या परिसरातील पाच टोळ्यांवर इचलकरंजी पोलीस दलाने मोक्का (संघटित गुन्हेगारी) कायद्यानुसार कारवाई केली. आणखीन दोन टोळ्या प्रस्तावित आहेत. या कारवाईमुळे शहर परिसरात पसरलेले गुन्हेगारीचे जाळे उजेडात आले असले तरी गुन्हेगारी क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. पोलिसांचे हे काम स्तुत्यच आहे. मात्र, शहरातील उजळ माथ्याने फिरणाºया व्हाईट कॉलरच्या टोळ्यांवरही अशी कडक कारवाई होणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.पोलिसांनी संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अमोल माळी टोळी, पी. आर. बॉईज टोळी, जर्मन टोळी, शाम लाखे टोळी व आता मुसा जमादार टोळी अशा पाच टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. या कारवाईमुळे म्होरक्यांसह या टोळ्यांमधील साथीदार चांगलेच धास्तावले आहेत.ही कारवाई करताना स्थानिक पोलिसांनी अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी पोलीस अधीक्षकांकडे आणि तेथून मंजूर होऊन अंतिम मंजुरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला. तेथून तपासणी होऊन त्याला मंजुरी मिळाली. त्यानुसार मोक्का न्यायालयात हजर करून या टोळ्यांवर पुढील कारवाई सुरू आहे.संघटित गुन्हेगारीअंतर्गत असणाºया या मोक्का कायद्यानुसार कागदपत्रांची पूर्तता होऊन या सर्व टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई होईलच, असे ठामपणे सांगता येत नाही. प्रस्ताव न्यायालयात टिकणे व शिक्षा लागणे, यासाठी पोलीस दलाचा चांगलाच कस लागणार आहे. शिक्षा लागली तर ठीक; अन्यथा पोलीस दलाने प्रयत्न केले होते; पण त्याला यश आले नाही, असे म्हणत पुढे सारवासारव होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातून सुटून जर या टोळ्या बाहेर पडल्या, तर त्यांची दहशत रोखणे पोलिसांना अवघड बनणार आहे. त्यामुळे याची वेळीच दखल घेत पोलिसांनी लहान-मोठ्या कायदेशीर बाबींची गांभीर्याने पाहणी करून नियोजनबद्धरीत्या पाठपुरावा करणे गरजेचे आहे.मास्टर मार्इंड, पडद्यामागचे सूत्रधार व व्हाईट कॉलर टोळ्यांविषयी बोलताना पोलीस म्हणतात, ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे साथीदार वापरत असल्यामुळे संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणे अवघड बनत असल्याचे सांगितले जाते.गुन्हेगार डोके लावून नियोजन करत असतील, तर पोलिसांनीही डोके लावून नियोजनबद्धरीत्या त्यांना अन्य मार्गाने का गुंतवत नाहीत, असाही सवाल उपस्थित होत आहे.