शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

दुरावलेले वाघाटीचे पिल्लू आईच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:49 AM

पुनर्भेट : बघ्यांच्या गर्दीमुळे दुसरे पिल्लू वंचित कोल्हापूर : कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेले दुर्मीळ वाघाटीचे (वाईल्ड ...

पुनर्भेट : बघ्यांच्या गर्दीमुळे दुसरे पिल्लू वंचित

कोल्हापूर : कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेले दुर्मीळ वाघाटीचे (वाईल्ड रस्टी स्पॉटेड कॅट) एक पिल्लू आईच्या कुशीत विसावले. त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा वनविभागाचा प्रयोग यशस्वी झाला असला तरी बघ्यांच्या गर्दीमुळे दुसऱ्या पिल्लाची मात्र त्याच्या आईशी भेट होऊ शकलेली नाही. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यासाठी प्रयत्नशील आहेत. आईसोबतचा हा पुनर्भेेटीचा सोहळा वनविभागाच्या कॅमेऱ्यात बंद झाला आहे.

कसबा बावडा येथील रमेश पाटील यांच्या उसाच्या शेतात ३० नोव्हेंबर रोजी आढळलेली वाघाटीची ही दोन पिल्ले बिबट्याची असल्याच्या अफवेमुळे काही उत्साही नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. यामुळे त्यांची आई या पिल्लांजवळ आली नाही. ही पिल्ले बिथरून जाऊ नयेत म्हणून बावडा रेस्क्यू फोरमच्या स्वयंसेवकांनी या पिल्लांना तातडीने वनविभागाच्या नियंत्रण कक्षाकडे सुपूर्द केले.

वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राचे स्वयंसेवक ऋषिकेश मेस्त्री, अमित कुंभार, समर्थ हराळे, अनिल ढोले, सानिका सावंत, वंशिका कांबळे यांच्यासोबत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी, बावडा रेस्क्यू फोरमचे स्वयंसेवक, कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक रावसाहेब काळे, करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनावणे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल विजय पाटील, वनरक्षक रुकेज मुल्लाणी गेले दोन दिवस या परिसरात ठिय्या मांडून आहेत.

वाघाटीच्या या दोन पिल्लांचे अंदाजे वय १३ ते १७ दिवस असून, मादी पिल्लाने नुकतेच डोळे उघडले होते; तर नर पिल्लाचे डोळे अद्यापही उघडलेले नव्हते. आईच्या दुधावर अवलंबून असणाऱ्या या पिल्लांची लवकरात लवकर आईसोबत पुनर्भेट व्हावी म्हणून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांंशी चर्चा केली. त्यानुसार त्याच दिवशी संध्याकाळी त्याच ठिकाणी पुनर्भेेटीसाठी या दोन्ही पिल्लांना सुरक्षितरीत्या ठेवले. ही प्रक्रिया नोंद करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावल्याची माहिती डॉ. संतोष वाळवेकर यांनी दिली आहे.

पिल्लाच्या हाकेला आईचा प्रतिसाद

एका पिल्लाने आईला आवाज देणे सुरू केले; परंतु दिवसभरातील गर्दीमुळे घाबरलेल्या वाघाटीने पिल्लांना प्रतिसाद दिला नव्हता. दोन ते तीन वेळा जागा बदलल्यानंतर १ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ०५.४९ वाजण्याच्या सुमारास पिल्लांच्या हाकेला प्रतिसाद देत दबकत-दबकत येऊन मादी पिलास आई घेऊन गेली. मात्र, घाबरल्यामुळे ती दुसऱ्या पिल्लास घेऊन गेली नाही. या पिल्लाच्या आईसोबतच्या पुनर्भेटीसाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

-------------------------------

फोटो : 0२१२२0२0 -कोल-वाघाटी पिल्लू

फोटो ओळी : कोल्हापुरातील कसबा बावडा येथे शेतात आढळलेल्या वाघाटीच्या पिल्लाची आईशी भेट झाली असली तरी बघ्यांच्या गर्दीमुळे दुसऱ्या पिल्लाला आईची प्रतीक्षा आहे.

फोटो : 0२१२२0२0 -कोल-वाघाटी मदर

फोटो ओळी : कोल्हापुरातील कसबा बावडा येथे शेतात आढळलेल्या वाघाटीच्या पिल्लाची आईशी झालेली पुनर्भेट वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बंदिस्त झाली आहे.