शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

' बिनविरोध नरेवाडी'साठी चाकरमान्यांची धडपड...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 5:48 PM

Grampanchyat Elecation Kolhapur- ग्रामदैवताची यात्रा, गणेश चतुर्थी, दिवाळी - उन्हाळ्याची सुट्टी किंवा सुख - दुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानेच चाकरमानीमंडळी जन्मगावी येतात. परंतु, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे - मुंबईसह अन्य ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नरेवाडीच्या प्रमुख मंडळींनी गेल्या आठवड्यापासून गावात तळ ठोकला आहे, ते केवळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणूनच.

ठळक मुद्दे' बिनविरोध नरेवाडी'साठी चाकरमान्यांची धडपड...! 'कमिटी'ची स्थापना : सुट्टी काढून प्रमुख मंडळींनी गावात ठोकलाय तळ..!

राम मगदूमगडहिंग्लज : ग्रामदैवताची यात्रा, गणेश चतुर्थी, दिवाळी - उन्हाळ्याची सुट्टी किंवा सुख - दुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानेच चाकरमानीमंडळी जन्मगावी येतात. परंतु, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे - मुंबईसह अन्य ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नरेवाडीच्या प्रमुख मंडळींनी गेल्या आठवड्यापासून गावात तळ ठोकला आहे, ते केवळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणूनच.नरेवाडी..! हे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील एक सुशिक्षित व सुसंस्कृत गाव. प्रामुख्याने शिक्षक, पोलीस आणि सैन्यदलात नोकरी करणाऱ्यांची संख्या गावात अधिक आहे. त्यांनीच आता गावच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचलला आहे. किंबहुना त्यासाठीच ग्रामपंचायत निवडणूक करण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.याकामी विद्यमान सरपंच चंदाबाई निलवे, गुंडू हमाल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्रनाथ पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कदम, इंजिनीअर दत्ताराम पाटील व सुधीर पाटील, शिक्षक नेते मधुकर येसणे व विनायक पोवार, डॉ. विनय पोवार, सुधाकर पाटील, नारायण पाटील, वसंत पाटील, आनंदा पाटील, आप्पा निलवे, महादेव येसणे, विवेकानंद आस्वले, प्रविण केसरकर, रवींद्र पाटील, धोंडीबा गोविलकर, भास्कर पाटील, आप्पा पाटील, मारुती कांबळे, सुर्यकांत कोकितकर, सिताराम येसणे, सुरेश पाटील, सुनील आस्वले, यांची कमिटी नेमण्यात आली आहे.राष्ट्रवादी, काँग्रेस, जनता दल, शिवसेना व भाजपा या प्रमुख पक्षांसह विविध गटांचे सक्रिय कार्यकर्ते गावात आहेत.परंतु, सर्वांनीच 'आम्ही नरेवाडी'करांच्या हाकेला चांगला प्रतिसाद दिला आहे.तसेच आजी - माजी ग्रामपंचायत सदस्यांसह अजिंक्य क्रीडा मंडळ व सनी स्पोर्ट्स क्लबनेही पाठिंबा दिला आहे. इच्छुकांच्या मुलाखती.!गावाच्या विकासासाठी काय -काय करणार ? यासह विविध प्रश्न विचारून कमिटीने इच्छुकांचा निवडणूक लढविण्याचा 'हेतू' जाणून घेतला. ९ जागांसाठी २४ जणांनी मुलाखती दिल्या.तसेच तरुणाईच्या काय भावना आहेत, हेही जाणून घेण्यात आले.सुमारे ९० महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन कमिटीसमोर आपल्या अपेक्षा मांडल्या. उमेदवारांसाठी निकष !व्यसनमुक्तीसह रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न, नोकरी-व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्मशानभूमीसह अन्य प्रलंबित मूलभूत सुविधांचा पाठपुरावा आणि सैन्य व पोलीस भरतीसाठी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी सुरू करण्याचा कमिटीचा संकल्प आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांनाच संधी देण्याचा त्यांचा विचार आहे.त्यामुळे कमिटीने उमेदवारांसाठी 'खास निकष' तयार केले आहेत.

  •  प्रभाग -३
  • सदस्य संख्या - ९
  • मतदार संख्या - १३९८

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर