कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या सेवापुस्तिकांच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावास सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून विलंब होत असल्यामुळे कामगारांना लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज, शुक्रवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी, तालुकास्तरावर शिबिरे घेऊन हे काम करण्याचे नियोजन केले आहे. महिन्याभरात हे काम पूर्ण होईल, असे आश्वासन कदम यांनी दिले.कामगारांना ज्यामुळे लाभ मिळू शकतात, त्या सेवापुस्तिकांचे नूतनीकरण करण्याचा कालावधी १५ महिन्यांचा आहे. १५ महिने पूर्ण झाल्यानंतर कामगारांनी वारंवार सहायक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून नूतनीकरणाबाबत मागणी केली; परंतु प्रत्येकवेळी कुठले ना कुठले कारण सांगून या कार्यालयाने त्याबाबत टाळाटाळच केली आहे. याच्या निषेधार्थ चार दिवसांपूर्वी बांधकाम कामगार संघटनेने कार्यालयासमोरच निदर्शने केली होती. त्याबाबत अधिक माहिती घेऊन ‘लोकमत’मधून ‘१२ हजार बांधकाम कामगार लाभांपासून वंचित’ ही बांधकाम कामगारांची बातमी दिली होती. याची दखल घेत आज, शुक्रवारी शिवसेनेने निवेदन देऊन सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा केली. शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, युवा सेना जिल्हाप्रमुख संदीप पाटील, अशोक पाटील, हर्षल पाटील, दिलीप सूर्यवंशी, धनाजी यादव, वारा जांभळे, अमित नेर्लेकर, रोहित शिंदे, सुधीर राणे, विजय चौगले आदींचा समावेश होता.सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून महिन्याभरात राबविल्या जाणाऱ्या शिबिराचे वेळापत्रक लेखी द्यावे, अशी मागणी शिवसेनेने आयुक्त सुहास कदम यांच्याकडे केली होती. त्यानुसार या कार्यालयाने शिवसेनेला लेखी कार्यक्रम दिला. तो खालीलप्रमाणे :
सेवापुस्तक नूतनीकरण महिन्याभरात करणार
By admin | Published: December 27, 2014 12:13 AM