शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

सरकारी रुग्णालयांत सेवा शुल्क वाढ

By admin | Published: December 30, 2015 12:09 AM

शासनाचा निर्णय : दरवाढ योग्य; पण चांगल्या सुविधा देण्याची नागरिकांची मागणी -शासकीय रुग्णालयांतील दरवाढ रद्द करा : सतेज पाटील

कोल्हापूर : शासकीय रुग्णालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवांमध्ये शुल्कवाढ केली आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी योग्य असली तरीही शासनाने सुविधा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयांतर्गत कोडोली, गडहिंग्लज, गांधीनगर, सेवा रुग्णालय (लाईन बझार) व १६ ग्रामीण रुग्णालये येतात. ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, १८ वर्षांपर्यंतची मुले-मुली, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत समाविष्ट आजार, आदींना मोफत सुविधा दिली जाते. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत दीड लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. सध्याचा केसपेपरचा दर पाच रुपयांचा असून, तो दहा रुपये होईल. खासगी रुग्णालयांतील केसपेपरचे दर ५० रुपयांपासून ते दोनशे रुपयांच्या घरात आहेत. शासकीय रुग्णालयांतील दरवाढ रद्द करा : सतेज पाटीलकोल्हापूर : सर्व शासकीय रुग्णालयांतील सेवांसाठीचे दर दुपटी-तिपटीने वाढल्याने नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे. सर्वसामान्य जनतेला झळ पोहोचविणारी ही दरवाढ रद्द करावी, असे पत्रक माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.आरोग्य विभागातील सर्व शासकीय रुग्णालयांत काँग्रेस आघाडी सरकारने २००१ मध्ये सुधारित दर निश्चित केले होते; परंतु, भाजप-शिवसेना सरकारने दुप्पट-तिप्पट दर वाढविले आहेत. या दरवाढीमुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना या दरवाढीचा फार मोठा फटका बसणार आहे. उपचाराचे दर १५ वर्षांपासून स्थिर होते. दरामध्ये समानता असावी, असा आघाडी सरकारचा उद्देश होता. भाजप-शिवसेना सरकारने आघाडी सरकारवर महागाई वाढविल्याची टीका केली होती; पण त्यांनी आघाडी सरकारपेक्षा दुपटी-तिपटीने दर वाढविले आहेत. यामुळे खासगी रुग्णालयांचे दर परवडत नसल्याने उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना येथेही भरमसाट शुल्क द्यावे लागणार आहे. म्हणून, सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेला आदेश रद्द करावा व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे पत्रकात म्हटले आहे.शासनाने शुल्कवाढ केल्याचा आदेश अजून मिळालेला नाही. सध्या ‘सीपीआर’मध्ये शासनाकडून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अथवा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमधून सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळत आहेत.-डॉ. विलास देशमुख, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर, कोल्हापूर.सद्य:स्थितीत शासनाने केलेली शुल्कवाढ योग्य आहे. त्या मानाने आता सर्वसामान्यांना रुग्णालयांनी चांगल्या सेवा द्याव्यात. - वसंत मुळीक, निमंत्रक, सीपीआर बचाव कृती समिती खासगीच्या मानाने शासकीय शुल्क दरवाढ योग्य आहे. शासनाने सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात, एवढीच अपेक्षा आहे.- सुनील करंबे, सदस्य, अभ्यागत समितीशासनाने शुल्क वाढविले आहे. सद्य:स्थितीत ही वाढ योग्य असली तरी शासनाने या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा रुग्णांना द्याव्यात.- रवी डांगे, नागरिकसीपीआर दृष्टिक्षेपात...(महिन्याभरात सरासरी होणारे उपचार)विभागसंख्याबाह्यरुग्ण विभाग (ओपीडी)४६,६५३ अंतर्रुग्ण ३२८८मुख्य शस्त्रक्रिया५८५किरकोळ शस्त्रक्रिया८३२प्रसूती३३०गर्भपात४२कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया५७० एमएलसी८००