कदमवाडी : लाईन बझारमधील सेवा रुग्णालय हे कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचा आधारवड ठरले असून असे स्वच्छ व चांगली सेवा देणारे रुग्णालय इतर रुग्णालयांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी काढले. सेवा रुग्णालयाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.रुग्णालयाला राष्ट्रीय पातळीवरील "लक्ष पुरस्कार", राज्यस्तरावरील राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन व कायकल्प पुरस्कार, जिल्हा स्तरावरील डॉ. आनंदीबाई जोशी गौरव हे पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारामध्ये योगदान देणाऱ्या रुग्णालयांतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांनी चित्रफितीद्वारे पूर्वीच्या व आताच्या सेवा रुग्णालयाचा केलेला कायापालट याची माहिती दिली.कार्यक्रमास माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, कागलच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. कल्याणी कदम, वसाहत रुग्णालय गांधीनगरच्या डॉ. विद्या पोळ, ग्रामीण रुग्णालय खुपिरेच्या डॉ. सरिता थोरात, पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. सुनंदा गायकवाड, शिरोळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. महेंद्र कुंभोजकर यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुनेत्रा शिराळे व डॉ. सी. एल. कदम यांनी केले. संतोष माने यांनी आभार मानले.अमन मित्तल हे स्वत: आपल्या कुटुंबीयांसह सेवा रुग्णालयात उपचार घेतात. यामुळे त्यांनी रुग्णालयातील सर्व टीमचा सेवा देण्याची पद्धत व आपुलकीचे कौतुक केले.
कोरोना काळात सेवा रुग्णालय जनतेचा आधारवड :अमन मित्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 3:26 PM
Hospital, Kolhapurnews लाईन बझारमधील सेवा रुग्णालय हे कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचा आधारवड ठरले असून असे स्वच्छ व चांगली सेवा देणारे रुग्णालय इतर रुग्णालयांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी काढले.
ठळक मुद्देकोरोना काळात सेवा रुग्णालय जनतेचा आधारवड :अमन मित्तल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार