उचगाव :
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल ते लक्ष्मी टेकडी (कागल रोड) या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रस्त्यांवर अवजड वाहनांची दुरुस्ती केली जात असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. दुचाकीधारक, पादचाऱ्यांना या सेवा रस्त्यावरून मार्ग काढणेही जिकिरीचे बनत आहे. तावडे हॉटेल ते लक्ष्मी टेकडीपर्यंतच्या सेवा रस्त्यावरच अवजड वाहने दुरुस्तीसाठी थांबलेली असतात. विशेष म्हणजे नादुरुस्त गाड्यांच्या रस्त्यावरच रांगा लागत असल्याने या रस्त्यावरून जाणारे पादचारी व दुचाकीचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
चौकट : सेवा रस्त्याची आजअखेर डागडुजी झालेली नाही. मुख्य हायवे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सेवा रस्त्यावरील समस्या जैसे थै आहेत. रस्त्याच्या साईटपट्ट्या मजबूत करणाअभावी उघड्या पडल्या आहेत. खचलेल्या रस्त्यावरील माती वर आल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सेवा रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
फोटो : २५ उचगाव रस्ता
ओळ: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावरच अवजड वाहनांची दुरुस्ती केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होते.