शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नवा ‘आयटी पार्क’ करा, पण आधी स्थानिक उद्योजकांना जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:21 AM

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यात नवा आयटी पार्क होणार असेल, तर चांगले आहे. पण, आमच्यासाठी आरक्षित केलेली जागा ...

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यात नवा आयटी पार्क होणार असेल, तर चांगले आहे. पण, आमच्यासाठी आरक्षित केलेली जागा आधी सरकार आणि महानगरपालिकेने आम्हाला द्यावी, अशी मागणी स्थानिक आयटी उद्योजकांनी केली आहे. जागा हस्तांतरणासाठी गेल्या बारा वर्षांपासून हे उद्योजक प्रतीक्षा करीत आहेत. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात शंभर एकरमध्ये मोठा आयटी पार्क उभारण्याची घोषणा शनिवारी (दि. १३) केली. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील सध्याच्या आयटी उद्योगांची स्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. स्वत:च्या ताकदीवर कोल्हापूरमधील आयटी उद्योग कार्यरत आहे. त्यात बीपीओ, सॉफ्टवेअर्स डेव्हलर्स, हार्डवेअर, कॉम्प्युटर्स डीलर्स आदींचा समावेश आहे. व्यवसायाची क्षमता वाढविण्यासाठी विस्तार आवश्यक असल्याने ‘आयटी असोसिएशन’च्या माध्यमातून या उद्योजकांनी आयटी पार्कच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले. त्याला महानगरपालिकेने सकारात्मक साथ देत टेंबलाईवाडीतील टिंबर मार्केट परिसरातील साडेतीन एकर जागा मंजूर केली. ‘आयटी असोसिएशन’च्या पाठपुराव्यामुळे गेल्या चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने सव्वातीन एकर जागाही आयटी पार्कसाठी आरक्षित केली. मात्र, अजून ती जागा या असोसिएशनकडे हस्तांतरित झालेली नाही. या जागेतील ४० टक्के जागा स्थानिक उद्योजकांना देण्याचा नवा प्रस्ताव महापालिकेचा आहे. ही जागा असोसिएशनकडे हस्तांतरित केल्यास स्थानिक उद्योजकांना बळ मिळेल. रोजगारवाढीसह जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. कौशल्य असलेले मनुष्यबळ, नैसर्गिक अनुकूलता आणि बंगलोर, गोवा, हैदराबाद यांच्याशी असलेल्या दळणवळणाच्या संलग्नतेमुळे पर्यटन क्षेत्राप्रमाणेच देशातील आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. कोल्हापूरमध्ये अँड्रॉईड, डॉटनेट अशा सर्व तंत्रज्ञानांवर काम चालते. स्थानिक आयटी उद्योगामुळे सध्या सुमारे दहा हजारजणांना रोजगार मिळाला आहे. ते लक्षात घेऊन स्थानिक उद्योजकांना लवकर जागा मिळणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया

स्थानिक आयटी उद्योजकांना बळ देण्यासाठी नवा पार्क उभारण्यासाठी असोसिएशनचे गेल्या १२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. जागा आरक्षित झाली. केपीएमजी या सल्लागार कंपनीने महापालिकेला अहवाल दिला आहे. त्यावर वेगाने कार्यवाही करून महापालिकेने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. सरकार करणार असलेल्या नव्या पार्कला आमची हरकत नाही.

- शांताराम सुर्वे, अध्यक्ष, आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर.

प्रतिक्रिया

बाहेरील कंपन्या एखाद्या शहरात जाण्यापूर्वी तेथील स्थानिक उद्योगांचा सेटअप लक्षात घेतात. त्यामुळे स्थानिक आयटी उद्योजकांना पाठबळ देणे आधी महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने महापालिका, राज्य सरकारने वेगाने पाऊले टाकावीत.

-विनय गुप्ते, स्थानिक आयटी उद्योजक