शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सात मैदाने, ट्रॅक खुले होणार

By admin | Published: March 03, 2015 10:50 PM

विभागीय क्रीडा संकुल : उद्या औपचारिक उद्घाटन, जलतरण तलावासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा

कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता बनलेल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या खुले होण्याची गेल्या सहा वर्षांची खेळाडू, करवीरवासीयांची प्रतीक्षा संपली आहे. संकुलाचे औपचारिक उद्घाटन गुरुवारी (दि.५) होणार आहे. यावेळी मातीचा धावपट्टी मार्ग (ट्रॅक), फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉलची मैदाने, दोन टेनिसकोर्ट खुली होतील. शूटिंग रेंजचे पूर्णत्व महिनाअखेर होईल. जलतरण तलावासाठी मात्र, तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.प्रशासनाकडे अडकलेली देयके, तांत्रिक अडचणी आदींमुळे गेल्या अडीच वर्षांपासून विभागीय क्रीडा संकुलाचे काम रेंगाळले. जानेवारीच्या अखेरीस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ठेकेदार श्रीहरी असोसिएटस्चे संचालक सचिन मुळे यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यात त्याची देयके अदा करून महिन्याभरात संकुलाच्या कामातील पहिला टप्पा खुला करण्यास सांगितले. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील अपूर्णावस्थेतील कामे वेगाने सुरू झाली. संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील सध्या चारशे मीटरचा धावणे मार्ग, दोन टेनिस कोर्ट, प्रेक्षक गॅलरी, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल अशा सात मैदानांचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्त्यांच्या खडीकरण पूर्ण झाले असून डांबरीकरणाचे काम सुरू आहे. उद्घाटनाची वेळ दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने काम पूर्णत्वाची ठेकेदार कंपनीची लगबग सुरू आहे. दिवसा मैदाने, ट्रॅकची अपूर्ण असलेली किरकोळ कामे आणि पूर्ण झालेल्या इमारतींच्या रंगरंगोटी, विद्युतीकरण, स्वच्छतेचे काम सुरू आहे. त्यासाठी १५० हून अधिक मजूर कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)————————‘लोकमत’ने जागे ठेवलेविभागीय क्रीडा संकुलाच्या पायाभरणीपासून ‘लोकमत’ने येथील कामकाज, क्रीडा विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडील कार्यवाहीवर नजर ठेवली. संकुलाच्या बांधकामाचा दर्जा, स्थिती, ठेकेदारासमोरील अडचणी, त्यावरील पर्याय, प्रशासनाची भूमिका, आदींवर सातत्याने प्रकाशझोत टाकला होता. त्यानुसार संकुलाचे काम करणारी कंपनी आणि प्रशासन जागे राहिले. ‘लोकमत’ने जागे ठेवल्याची भूमिका निभावली. त्यामुळे संकुलाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने पुढे जाऊ शकल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ‘शब्द’ दिल्याप्रमाणे कंपनीच्या संचालकांनी कामांची पूर्तता केली. अंतर्गत रस्ते, ट्रॅक आणि टेनिस कोर्टची राहिलेली किरकोळ कामे सध्या पूर्ण केली जात आहेत. शूटिंग रेंजची इमारत पूर्ण झाली असून, काही अंतर्गत कामे सुरू आहेत. त्याची पूर्तता करून रेंज ३१ मार्चपर्यंत खुली केली जाईल. सांडपाणी निर्गतीकरणाबाबत पर्यायांवर काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत जलतरणाचे काम पूर्ण केले जाईल.- सुहास कुलकर्णी (प्रकल्प व्यवस्थापक, श्रीहरी असोसिएटस्)