शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सूतगिरण्यांना सात लाख गाठी कापूस आरक्षित

By admin | Published: January 05, 2017 1:15 AM

देशमुख यांचा निर्णय : यंत्रमाग वीजदर व कर्जावरील व्याज अनुदान प्रस्ताव जानेवारीअखेर

इचलकरंजी : यंत्रमागधारकांना कर्जावरील व्याजदराचे अनुदान आणि वीजदराची सवलत हे प्रस्ताव चालू जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावेत. प्रचलित यंत्रमागाचे रॅपियर लुममध्ये रूपांतर व शटललेस लुमसाठी व्याज सवलत या प्रस्तावांसाठी अनुदान देणे, तसेच सूतगिरण्यांना यंत्रमाग उद्योगासाठी सुताची विक्री बंधनकारक करणे, अशा आमदार हाळवणकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे निर्णय वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आले.यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था तसेच सूतगिरण्यांच्या समस्यांवर निर्णय घेण्यासाठी बुधवारी मंत्रालयातील बैठकीसाठी वस्त्रोद्योग खात्याचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, वस्त्रोद्योग संचालक मीना, आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, सुरेश पाटील, वित्त व नियोजन विभागाचे उपसचिव, आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये आमदार हाळवणकर यांनी गेल्या दोन्ही विधानसभा अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यात यंत्रमागधारकांना कर्जावरील पाच टक्के व्याज अनुदान पाच वर्षे देणे, १ जुलै २०१६ पासून वीजदरात प्रतियुनिट एक रुपये अनुदान देणे, या प्रस्तावांची माहिती सचिवांनी दिली. वित्त विभागाकडे प्रलंबित असलेले हे दोन्ही प्रस्ताव जानेवारीअखेर मंत्रिमंडळासमोर सादर करावेत. या दोन्ही प्रस्तावांना मान्यता मिळेल, अशी कार्यवाही करण्याचे आदेश वस्त्रोद्योग सचिव उज्ज्वल उके यांना सुभाष देशमुख यांनी दिले. साध्या यंत्रमागाचे आधुनिकीकरण करून त्याचे रॅपियर लुममध्ये रूपांतर करण्यासाठी येणाऱ्या ८० हजार रुपये खर्चापैकी केंद्र सरकारने ४० हजार रुपये, राज्य शासनाने १० हजार रुपये अनुदान द्यावे. तर उर्वरित तीस हजार रुपयांची रक्कम यंत्रमाग उद्योजकाने वित्तीय संस्थेमार्फत कर्जाऊ घ्यावी. या कर्जाचे दहा टक्के व्याज अनुदान राज्यशासन देईल, असाही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे वस्त्रोद्योगमंत्र्यांनी सांगितले. साधे यंत्रमाग बदलून त्याठिकाणी चार लाख रुपये किमतीचे शटललेस लुम खरेदी करणाऱ्या यंत्रमागधारकाला केंद्र सरकारकडून दहा टक्के अनुदान व राज्य शासनाकडून सात टक्के व्याजदर अनुदान संबंधित वित्तीय संस्थांना थेट देण्याचा धोरणात्मक निर्णय बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला. हा प्रस्तावसुद्धा मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार आहे. वस्त्रोद्योगासाठी नेमण्यात आलेल्या आमदार हाळवणकर समितीच्या अहवालातील शिफारशींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यातील ८० टक्के शिफारशी बुधवारच्या बैठकीत मान्य करण्यात आल्या. याची लवकरच अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश मंत्री देशमुख यांनी दिले असल्याची माहिती आमदार हाळवणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे. (प्रतिनिधी)राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना सात लाख गाठी कापूस वर्षभरासाठी लागतो. हा कापूस पणन खात्यामार्फत खरेदी करून तो आरक्षित ठेवावा. तो पुढे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सूतगिरण्यांना वर्षभरासाठी पुरवावा. त्या मोबदल्यात सूतगिरण्यांनी त्यांच्याकडे उत्पादित सुतापैकी दहा टक्के सूत छोट्या यंत्रमागधारकांना देण्याचे बंधन राहील. तसेच सूतगिरण्यांना वीजदरात प्रतियुनिट तीन रुपये सवलत व प्रती चाती तीन हजार रुपये कर्जावरील व्याजाचे अनुदान शासनामार्फत देता येईल, असाही निर्णय या बैठकीत झाला.मुंबई येथे मंत्रालयात वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबतच्या बैठकीत यंत्रमाग उद्योगाची माहिती आ. सुरेश हाळवणकर यांनी दिली. हिंदुराव शेळके, अशोक स्वामी, सचिव उज्ज्वल उके, संचालक मीना उपस्थित होते.