शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

मानसिंगसह सहाजणांवर गुन्हा

By admin | Published: March 06, 2016 1:08 AM

बनावट मृत्युपत्र : चंद्रकांत बोंद्रे यांची संपत्ती लाटण्याचा प्रयत्न

 कोल्हापूर : बनावट मृत्युपत्राचा वापर करून मृत चंद्रकात ऊर्फ सुभाष श्रीपतराव बोंद्रे यांची स्थावर मालमत्ता बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांचा पुतण्या मानसिंग बोंद्रे याच्यासह सहाजणांवर शनिवारी न्यायालयाच्या आदेशानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित आरोपी मानसिंग विजयराव बोंद्रे (वय ३१, रा. अंबाई टँक), सुनील पी. शिंदे (३५), टी. एस. पाडेकर (४० दोघे, रा. शनिवार पेठ), रूपेश रघुनाथ खांडेकर (२९, कसबा बीड, ता. करवीर), बाबासाहेब शंकरराव पाटील (३२, हरिओमनगर, रंकाळा), अजित व्ही. कदम (४०, रा. श्रीकृष्ण पार्क, फुलेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक चंद्रकांत बोंद्रे (२६, रा. अंबाई टँक) यांनी फिर्याद दिली आहे. चंद्रकात बोंद्रे हे शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांत अग्रेसर होते. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळ येथेही ते संचालक होते. त्यांच्या मालकीच्या अनेक मिळकती आहेत. त्यांतील काही त्यांच्या वाटणीस वडिलार्जीत हिश्श्याने आल्या आहेत व काही स्वकष्टार्र्जित आहेत. तसेच त्यांच्या नावावर विविध बँकांमध्ये ठेवी, बचत खात्यावर रक्कम, विमा कंपनीच्या रकमा, संस्थांचे शेअर्स आहेत. चंद्रकांत बोंद्रे यांच्या निधनानंतर त्यांचा पुतण्या मानसिंग बोंद्रे यांनी गावकामगार तलाठी, ग्रामपंचायत नागदेववाडी, सांगवडे, सिटी सर्व्हे करवीर, आदी ठिकाणी चंद्रकांत बोंद्रे यांच्या मालकीच्या मिळकत पत्रकी व सातबाराला नाव नोंद होण्यासाठी अर्ज दिला. या प्रकाराची माहिती त्यांचा मुलगा अभिषेक बोंद्रे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता मानसिंग बोंद्रे यांनी १६ आॅक्टोबर २०१५ रोजी तलाठी यांच्याकडे मृत बोंद्रे यांनी ७ एप्रिल २०१५ रोजी मृत्युपत्र करून ठेवल्याचे व त्यामध्ये सर्व मिळकती स्थावर व जंगम मालमत्ता मानसिंग बोंद्रे यांचे नावे केल्याचे नोंद असल्याचे अर्जामध्ये दिसून आले. अभिषेक बोंद्रे यांनी, संशयित आरोपींनी मृत चंद्रकांत बोंद्रे यांच्या नावे बनावट मृत्युपत्र तयार करून संपत्ती बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे करीत आहेत. (प्रतिनिधी)