कोल्हापूर : खीर पिण्यासाठी देतो असे सांगून घरी नेऊन नातीच्या वयाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मोहम्मद रफीक शेख (वय ५४, रा. ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) याला प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गुरुवारी दोषी ठरवले, त्याला २० वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात सहायक सरकारी वकील ए. ए. पाटोळे यांनी काम पाहिले.
खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, ३०सप्टेंबर २०१५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका ७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस खीर पिण्याचे आमिष दाखवून तिला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला होता. घटनेवेळी जागरुक नागरिकांना संशय आल्याने त्यांनी आरोपी मोहम्मद शेख याला रंगेहाथ पकडून त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली होती. तसेच त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याचा तपास करून एम. आर. मोरे यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ए. ए. पाटोळे यांनी काम पाहिले.
खटल्यात सात साक्षीदार तपासले. साक्षीदाराची साक्ष, सीपीआरचे वैद्यकीय अधिका-याची साक्ष तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य माणून प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपीस दोषी ठरवले. त्यानुसार आरोपी मोहम्मद शेख याला २० वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, दंड न भरल्यास आरोपीस आणखी सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.
दरम्यान, आरोपीकडून जमा होणा-या दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे प्रमोद जाधव, पोलीस नाईक जे. एस. खाडे, हरीश सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फोटो नं. २४०६२०२१-कोल-मोहमद शेख (आरोपी-कोर्ट)
===Photopath===
240621\24kol_1_24062021_5.jpg
===Caption===
फोटो नं. २४०६२०२१-कोल-मोहमद शेख (आरोपी-कोर्ट)