मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी व आठवीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे शाळा, शैक्षणिक वस्तू भांडार तसेच शिक्षण विभागाला पत्र पाठवून सूचना केली आहे. शैक्षणिक वर्ष २०१८ - १९मध्ये आठवीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) व इयत्ता चौथी व पाचवीचा परिसर अभ्यास भाग १ व २ ही पाठ्यपुस्तके पुढील वर्षी (२०१८- १९) मध्ये बदलणे अपेक्षित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये जुन्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष आहे.शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ मध्ये ेइयत्ता आठवी व दहावीची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. त्यामुळे २०१७ - १८ हे इयत्ता आठवी व दहावीच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष आहे. आठवीचा अभ्यासक्रम पुढीलवर्षी बदलणार असला तरी येत्या शैक्षणिक वर्षात संस्कृत प्रवेश व प्रवेशिका ही पुस्तके बदलण्यात येणार आहेत. पुढीलवर्षी अभ्यासक्रम बदलणार असला तरी यावर्षी संस्कृतची पुस्तके बदलण्याचा घाट घातला जात आहे. गेली काही वर्षे विद्यार्थ्यांना थेट शाळेतून पुस्तके देण्यात येत आहेत. शासनमान्य शाळांतून पुस्तके देण्यात येत आहेत. केवळ खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना बाजारातून पुस्तके विकत घ्यावी लागतात. त्यामुळे दुकानातून पुस्तकांची संख्या मर्यादित असली तरी स्वाध्याय पुस्तिका, मार्गदर्शक मात्र विक्रीस उपलब्ध आहेत.चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या मराठी माध्यमाची विद्यार्थीसंख्या १ लाख ३९ हजार २३७, तर उर्दू माध्यमाची संख्या १० हजार २५६ इतकी आहे. एकूण १ लाख ४९ हजार ४९३ विद्यार्थी अध्यापन करीत आहेत. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ८ लाख ४ हजार ५४७ पाठ्यपुस्तके व २ लाख ३४ हजार ५२९ स्वाध्याय पुस्तिकांची आवश्यकता आहे. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ७३ हजार ३३९ पाठ्यपुस्तके व १३ हजार ४८३ स्वाध्याय पुस्तिका आवश्यक आहेत. स्वाध्याय पुस्तिका केवळ इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र, सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत असल्यामुळे पाठ्यपुस्तक महामंडळाकडून शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा, तालुका पातळीवर पुस्तकांचे वितरण केले जाते. परंतु यावर्षीपासून पाठ्यपुस्तके, स्वाध्यायपुस्तिकांऐवजी त्याचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे पैसे त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. मोफत पाठ्यपुस्तके योजनेच्या रकमा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत, शेड्युल, ग्रामीण बँक या बँकांमध्ये शून्य रकमेचे लाभार्थी खाते काढून या खात्याला संबंधित विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक निगडित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँकेत शून्य रकमेचे लाभार्थी खाते न काढल्यास विद्यार्थ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार नसल्याची स्पष्ट सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांनी काढली आहे. लवकरच पुस्तके बाजारातपुढील वर्षी चाथी आणि पाचवीचा परिसर अभ्यास तसेच तिसरीचा परिसर अभ्यास ही पुस्तके बदलण्यात येण्याची शक्यता आहे. यावर्षी सातवी आणि नववीची पुस्तके बदलण्यात येणार असून नवीन पुस्तके छपाईची प्रक्रियाही सुरु झाली आहे. लवकरच ही पुस्तके बाजारात उपलब्ध होणार आहेत.
नूतन वर्षात बदलणार सातवी, नववीचा अभ्यासक्रम
By admin | Published: April 05, 2017 11:35 PM