कोल्हापूर : शहरातील जयंती नाल्यासह ११ नाल्यातील सांडपाणी आजही थेट पंचगंगा नदीतच मिसळत असल्याचे शुक्रवारी प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पंचनाम्यात स्पष्ट झाले.
लोकमतने यासंदर्भातील वृत्त दिल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला नेहमीप्रमाणे जाग आली. आता महापालिकेवर नोटीस बजावण्याची सोपस्कार पार पाडले जातील. परंतू सध्य स्थितीला हे नाले तातडीने नदी जाण्यापासून कसे रोखता येतील हे उपाय योजना करणे महत्वाचे आहे.
प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी लोकमतच्या वृत्ताचा आधार घेत यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केली होती. यानुसार शुक्रवारी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, क्षेत्र अधिकारी सुशिल शिंदे, सचिन धरवड, महापालिका पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रबरे, आर.के. पाटील, रमेश कांबळे, आर.बी. गायकवाड, दिलीप देसाई यांनी १२ नाल्यांची पाहणी केली.