कोल्हापूर : असं म्हटल जात की आपली सावली कधी आपली साथ सोडत नाही. रविवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंद या कालावधीत मात्र, सावली आपली साथ ५२ सेकंदांपर्यंत सोडणार आहे. ही खगोल शास्त्रामधील ही अद्भूत घटना ‘झिरो् शॅडो डे’ अर्थात शून्य सावली दिवसानिमित्त आपणा सर्वांना हा अनूभव घेता येणार आहे.कर्क वृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षातून दोन वेळेला हा शू्न्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्क वृत्त , मकर वृत्त आणि विषूववृत्त या वृत्तावरती रहाणाऱ्या लोकांना वर्षातून एकदाच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. मात्र, कर्कवृत्ताच्या वरच्या भागात राहणाऱ्या व मकर वृत्ताच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना मात्र, या शून्य सावलीचा आनंद घेता येत नाही.
आपली पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते त्याला २३.५ डीग्री एवढा कल आहे. पृथ्वीच्या सुर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला आमनीक वृत्त असे म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तावरुन बरोबरी ३ महिन्यांनी वसंत संचात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो.
या दिवशी सुर्याची किरणे विषुववृत्तावरती वरुन पडतात.त्यामुळे विषूववृत्तावरती कुठेही आपण उभारलो तरी काही काळासाठी आपली सावली गायब होत असते. यानंतर बरोबरी तीन महिन्यानंतर मकर वृत्तावरती त्याच्या ३ महिन्यांनी परत विषुववृत्तावर आणि नंतर पुन्हा तीन महिन्यानंतर कर्क वृत्तावरती शुन्य सावलीचा आनंद घेता येणार आहे.सुरुवात कोल्हापूरातूनपृथ्वी जसजशी फिरत जाईल तसतसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून निरनिराळ्या दिवशी ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. याची सुरुवात कोल्हापूरातून रविवारपासून होईल.कर्कवृत्त व विषुववृत्त या दोन स्थानांच्या मध्ये सुर्याची किरणे ही ज्यावेळी १६.७४ डीग्री उत्तर या रेखांवृत्तावरती पडतील. त्यावेळी या ठिकाणी असणाऱ्या सर्व जागांवर काही सेकंदांपर्यंत शून्य सावलीचा आनंद घेता येणार आहे. त्यात आपलं कोल्हापूर त्यापैकी एक ठिकाण आहे.
रविवारी (दि. ६) रोजी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे ४ सेकंदांपर्यंत कोल्हापूरकरांना ५२ सेकंदांपर्यंत शून्य सावलीचा अद्भूत चमत्कार अनुभवता येणार आहे.- डॉ. मिलिंद कारंजकर, पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख, विवेकानंद कॉलेज