या सेंटरचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे प्रमुख उपस्थित होते. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक, रुग्णांना दिलासा मिळावा या उद्देशाने ५० बेडस्च्या शहाजीराजे कोविड सेंटरची उभारणी केली आहे. त्यामध्ये अकरा ऑक्सिजन बेडस आहेत. डॉक्टर, नर्सेस यांची १६ जणांची टीम कार्यरत असणार आहे. सवलतीच्या दरामध्ये याठिकाणी औषधोपचार केले जाणार आहेत. या सेंटरसाठी मानसिंग बोंद्रे फौंडेशनची मोठी मदत झाली असल्याचे मावळा कोल्हापूरचे अध्यक्ष उमेश पोवार यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ करवीरच्यावतीने या सेंटरसाठी ऑक्सिजनची २० रिकामी सिलिंडरची मदत करण्यात आली. यावेळी शिवराज नाईकवडे, अश्विन वागळे, रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष प्रमोद चौगुले, दिलीप प्रधाने, ‘मावळा कोल्हापूर’चे संतोष हेबाळे, युवराज पाटील, उदय देसाई, अभिजित भोसले, ओंकार नलवडे, नामदेव पोवार, विजय चोपदार, अनिकेत सावंत, संदीप चव्हाण, आदी उपस्थित होते.
चौकट
प्रशासनाने लालफितीचा कारभार टाळावा
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना काही सामाजिक संस्था, संघटना स्वयंस्फूर्तीने कोविड केअर सेंटर सुरू करत आहेत. या संस्था, संघटना एकप्रकारे प्रशासनाची मदत करत आहेत. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यापासून आवश्यक मदत करण्यासाठी प्रशासनाने लालफितीचा कारभार टाळावा. अशा सेंटरना त्वरित परवानगी द्यावी, असे माजी आमदार मालोजीराजे यांनी सांगितले. मावळा कोल्हापूर, मानसिंग बोंद्रे फौंडेशनचा कोविड सेंटर सुरू करण्याचा उपक्रम सामाजिक बांधीलकी जपणारा असून त्यांना आवश्यक ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो (२००५२०२१-कोल-शहाजीराजे कोविड सेंटर) : कोल्हापुरात गुरुवारी शहाजीराजे कोविड सेंटरचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी उमेश पोवार, मानसिंग बोंद्रे, मधुरिमाराजे, आमदार चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते.
===Photopath===
200521\20kol_7_20052021_5.jpg
===Caption===
फोटो (२००५२०२१-कोल-शहाजीराजे कोविड सेंटर) : कोल्हापुरात गुरूवारी शहाजीराजे कोविड सेंटरचे उदघाटन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी उमेश पोवार, मानसिंग बोंद्रे, मधुरिमाराजे, आमदार चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते.