शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांना शाहू पुरस्कार जाहीर, शाहू जयंतीदिनी होणार वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:40 AM

एक लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप

कोल्हापूर: नांदेड येथील रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ जनार्दन माधवराव वाघमारे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार आज, बुधवारी जाहीर झाला. एक लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या शाहू जयंतीदिनी २६ जूनला या पुरस्काराचे कोल्हापूर येथे वितरण करण्यात येणार आहे. डॉ. तात्याराव लहाणे यांनाही यावेळी गतवर्षी जाहीर झालेल्या शाहू पुरस्काराचे वितरण होणार आहे.राजर्षी शाहू मेमोरियट ट्रस्टचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी राहूल रेखावार, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. ११ नोव्हेंबर १९३४ रोजी जन्मलेले डॉ. वाघमारे हे लातूर जिल्ह्यातील कौसा ता. औसा येथील असून महाराष्ट्रात इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित, पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यास आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू आणि राज्यसभेचे खासदार अशा विविध पदांच्या माध्यमातून योगदान दिले आहे.२१ पुस्तकांचे लेखन२१ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना लातूरच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. त्यात त्यांनी बाजी मारली होती. ‘चिंतन एका नगराध्यक्षाचे’ असे त्यांचे आत्मचरित्रात्मक कांदबरीचेही लेखन केले असून. ‘शरद पवार अ प्रोफाईल इन लीडरशीप’ यासह त्यांनी चार इंग्रजी पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘द प्रॉब्लेम ऑफ आयडेंटिटि इन द पोस्ट वॉर अमेरिकन निग्रो नाॅव्हेल’ हा त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचा विषय होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती