शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

Shahu Chhatrapati 75th birthday: शाहू छत्रपतींना 'ही' भीती होती, परंतू..; संभाजीराजेंनी सांगितला खासदारकीबाबतचा किस्सा

By समीर देशपांडे | Published: January 07, 2023 12:58 PM

ती मिठी मी कधीही विसरू शकत नाही

आमचे राजघराणे. त्यात आणि मी थोरला. त्यामुळे माझ्या एकूणच वाटचालीकडे अगदी आतासुध्दा बारीक लक्ष असते. मी तिसरी ते आठवी राजकोटला शिकलो. त्यावेळी बाबा मला सोडायला यायचे. ते परत जाताना मला मिठीत घ्यायचे. त्यानंतर हळूहळू मोठा होत गेलो. एकूणच त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती असल्याने नंतरच्या काळात त्यांनी मिठीत घेणं झालं नाही. पण तो क्षण पुन्हा अनेक वर्षांनी आला. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार झाल्यानंतर. माझी नियुक्ती झाली होती. मी बाहेरून आलो. पॅलेसवर जल्लोष चालला होता आणि मी आल्या आल्या बाबांनी मला मिठीत घेतलं. ही मिठी मी कधीही विसरू शकत नाही.आम्ही राजघराण्यातील आहोत म्हणून त्यांनी कधीही मला किंवा मालोजींना वेगळी वागणूक कुठेच दिली नाही. तुम्ही सर्वांसारखेच आहात हे त्यांनी पहिल्यापासून बिंबवले. त्यामुळे मी सेंट झेविअर्सला असताना पुण्यासह अनेक ठिकाणी सामने खेळायला एस. टी. तून गेलो आहे म्हणून मी आज जेव्हा राज्यभर फिरतो, वेळ पडली तर शेतातच जेवतो. घोंगडे टाकून झोपतो. त्याच्यामागे बाबांची शिकवण आहे. मी पट्टीचा पोहतो. पण मला आताच्या माझ्या कार्यालयासमोर बाबांचे कार्यालय होते. तेथे वर एक खोल पाण्याची टाकी होती. त्यात दोरी सोडून मला पहिल्यांदा बाबांनी पोहायला शिकवलं. माझी भीती घालवली नंतर मी तलावात शिकलो.माझ्या खासदारकीच्या निवडणुकीवेळी त्यांनी मला उमेदवारी मिळाल्यानंतरही तुम्ही उभे राहू नका, असा सल्ला दिला होता. अर्थात तो मी मानला नाही. पराभव झाला; परंतु समाजासाठी काहीतरी करत राहा हा बाबांचाच संदेश घेऊन मग मी राज्यभर बाहेर पडलो. राष्ट्रपती नियुक्त खासदार झाल्यानंतर संसदेच्या कामकाजापुरता भाजपला पाठिंबा देण्यासाठी मी सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. हे त्यांना खटकले. परंतु या पदाच्या जोरावर मी दिल्लीत शिव शाहू विचार प्रभावीपणे मांडण्यापासून ते रायगडाच्या विकासासाठी भरीव काही तरी करू शकलो हे देखील वास्तव आहे.वेगळ्या वाटेने जाणार नाही..मी सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्यानंतरच्या मी पुढे काय निर्णय घेतो याची त्यांना वैचारिक परंपरेतून भीती होती; परंतु तसे काही मी करणार नाही, असाही विश्वास माझ्याकडून त्यांना मिळाला आहे. राजघराण्याचे संस्कार आणि बाबा यांच्यामुळेच आजचा हा संभाजी छत्रपती घडला आहे एवढे निश्चित.

- संभाजीराजे छत्रपती (शब्दांकन.. समीर देशपांडे )

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती