कोल्हापूर : शाहू जयंतीनिमित्त शनिवारी शिरोली मनुफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने स्मॅक भवन येथे उद्योगपती दीपक जाधव यांच्या हस्ते शाहूंच्या पुतळ्याचे अनावरण व पूजन करण्यात आले.
ही शिल्पाकृती फायबरमध्ये असून, त्याखाली ‘उद्योग व व्यापार करण्याचे साहस जर आपण केले नाही तर आपल्या सर्व चळवळी निस्तेज होतील’ हे शाहू महाराजांचे विचार लिहिण्यात आले आहेत. अध्यक्ष अतुल पाटील यांनी मूर्ती निर्मितीमागील भूमिका विशद केली. शिल्पकार ओंकार कोळेकर यांनी सांगितले, हे शिल्प इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या मार्गदर्शनातून तयार केले आहे. यावेळी शाहूंच्या जीवनपटावरील चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी उद्योगपती दीपक जाधव, चंद्रशेखर डोली, नारायण बुधले व बदाम पाटील यांना शाहू महाराजांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास स्मॅकचे सेक्रेटरी जयदीप चौगले, ट्रेझरर एम. वाय. पाटील, स्मॅक आयटीआय चेअरमन राजू पाटील, सेमिनार कमिटी चेअरमन अमर जाधव, संचालक प्रशांत शेळके, स्वीकृत संचालक भरत जाधव, निमंत्रित सदस्य रवी डोली, उद्योगपती सचिन बुधले उपस्थित होते.
--
फोटो नं २६०६२०२१-कोल-स्मॅक
ओळ : स्मॅक भवन येथे शनिवारी मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
---
चित्रपट महामंडळातर्फे अभिवादन
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे शनिवारी शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ कॅमेरामन नंदकुमार पाटील व संस्थेचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी सहखजिनदार शरद चव्हाण, रणजित जाधव, रवींद्र गावडे, सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, मंजित माने, अरुण चोपदार, सदाशिव पाटील, सुरेंद्र पाटील, अजय कुरणे, सुनील मुसळे, बबन बिरंजे, दिलीप काटे, प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर, नम्रता गोडबोले, ऐश्वर्या पाटील, अरुण पाटील, सिद्धेश मंगेशकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
---
परिवर्तन फौंडेशनतर्फे शाहू जयंती
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील परिवर्तन फौंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी किरण लोहार होते.
यावेळी ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके, पांडुरंग मोहनगेकर, विवेक ठाकूर, निवृत्ती बेनके, वसंत व्हडगे, विश्वनाथ पाटील, खेमाणा बोकडे, उस्मान मुकादम, वासंती लोहार, वैशाली साळुंखे, जनार्दन कवडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुजित चव्हाण, शाहू मॅरेथॉनचे अध्यक्ष किसन भोसले, पृथ्वीराज पठाडे, ॲड. राहुल सडोलीकर, प्रा. आनंद भोजने, अजित चव्हाण, मनीषा घुणकीकर, राज कुरणे, सुरेश जरग उपस्थित होते. अमोल कुरणे यांनी प्रास्ताविक केले.
--