कोल्हापूर : प्रकृतीची काळजी घेऊन उपोषण स्थगित करा अशी विनंती करण्यासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज उद्या मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या गावी जाऊन भेटणार आहेत.
सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत सोमवारी रात्री न्यू पॅलेस मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्ते उद्या मंगळवारी पहाटे कोल्हापुरातून निघणार आहेत