शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

शाहू समाधीप्रश्नी उद्या व्यापक बैठक, जिल्हाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:47 AM

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी उद्या, शुक्रवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात व्यापक बैठक आयोजित करून त्यामध्ये सामंजस्यातून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शाहू भक्तांच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, समाधीस्थळाबाबतचा निर्णय समन्वयातून घ्यावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले.

ठळक मुद्देशाहू समाधीप्रश्नी उद्या व्यापक बैठक जिल्हाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाचे आश्वासन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी उद्या, शुक्रवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात व्यापक बैठक आयोजित करून त्यामध्ये सामंजस्यातून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शाहू भक्तांच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, समाधीस्थळाबाबतचा निर्णय समन्वयातून घ्यावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले.कोल्हापुरातील शाहू भक्तांचे एक शिष्टमंडळ बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी देसाई यांना भेटले व शाहू समाधीस्थळाच्या बांधकामाबाबत निवेदन दिले. आम्ही शाहू -फुले-आंबेडकरांचा वारसा चालविणारे कोल्हापूरकर आहोत; त्यामुळे दोन जातींत तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. राजर्षी शाहू महाराज यांनी स्वत: आपली समाधी दलित समाजाच्या वसाहतीशेजारी असावी, असे सांगितलेहोते; त्यामुळेच ही समाधी नर्सरी बागेत होत आहे.

शाहू समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी सिद्धार्थनगरातील कार्यकर्त्यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.(छाया : नसीर अत्तार)

तसेच येथे शाहू महाराज यांचे वडील चौथे शिवाजी, मातोश्री आनंदीबाई यांची समाधी तर पुत्र प्रिन्स शिवाजी व करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराराणी यांची मंदिरे तेथे आहेत. यापूर्वी ताराराणी यांची संगमरवरी दगडाची मूर्ती कोणी अज्ञाताने फोडली आहे; त्यामुळे हा परिसर सुरक्षित राहिलेला नाही. म्हणूनच संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे दिलीप देसाई यांनी सांगितले.या शिष्टमंडळात सतीशचंद्र कांबळे, पंडितराव सडोलीकर, अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासणे, अशोक रामचंदाणी, भगवान काटे, महादेव पाटील, फिरोजखान उस्ताद, विनोद डुणुंग, किसन कल्याणकर, बी. एल. बरगे, चंद्रकांत यादव, रणजित गावडे, संभाजी जगदाळे, भारत घोंगडे, प्रकाश पाटील, राजू माने, विजय पोळ, गुरूप्रसाद माळकर, अमित आडसुळे, स्वप्निल पार्टे यांचा समावेश होता.समन्वयातून मार्ग काढा : खा. संभाजीराजेदरम्यान, सिद्धार्थनगरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सायंकाळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. संभाजीराजे जिल्हाधिकाºयांसमवेत शिवाजी पुलाची पाहणी करण्याकरिता गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने सिद्धार्थनगराकडील बाजूस प्रवेशद्वार करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल व तेथील व्यायामशाळा हलवू नये, यासह अन्य काही मागण्या केल्या. तेव्हा संभाजीराजेंनी जिल्हाधिकाºयांना व्यापक बैठक घेऊन समन्वयातून मार्ग काढावा, असे सांगितले. शिष्टमंडळात शहाजी कांबळे, संजय माळी, बाळासाहेब भोसले, भारत रुईकर, वसंत लिंगनूरकर, सुशील कोल्हटकर, अमोल कांबळे यांचा समावेश होता.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर