कोल्हापूर : ऐतिहासिक दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यासाठी टोप, शिये परिसरातील खाणींतून निघणारा काळा दगड वापरला असून, आतापर्यंत सुमारे पाच हजार रनिंग फूट दगड लागला आहे. स्थानिक पाथरवट आणि स्थानिक परिसरात मिळणाराच दगड वापरला जात आहे. दगडाचे घडकाम अर्थात बोरड (टाके) मारण्याचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. टोप परिसरातील खाणींतून मिळणारा गोपरे (काळा)दगड या सुशोभीकरणासाठी वापरण्यात आला आहे. हा दगड यापूर्वी जोतिबा येथील पायऱ्यांसाठी वापरण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे पाच हजार रनिंग फूट दगड या कामात वापरला असून, कठड्यासाठी ‘कारनेस गलथा’ दगड वापरण्यात आला आहे. घडकाम करण्याचे काम कोल्हापुरातील रवींद्र कलकुटकी, सुभाष पाथरवट, सदाशिव पाथरवट, दिनेश पाथरवट हे करीत आहेत. सुशोभीकरणासाठी दहा लाख इतका खर्च आला असून, महापालिकेच्या निधीतून हा खर्च करण्यात येत आहे. याशिवाय या पुतळ्याभोवती कारंजा व बाग करण्यासाठी अंदाजे पाच लाख इतका जादाचा खर्च येणार आहे. हाही खर्च महापालिका निधीतून देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिला आहे. त्यामुळे ऐतिहासिक दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज पुतळा परिसराचे रूपडे लवकरच पालटणार आहे. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)साडेपाच हजार फूट दगडटोप, शिये परिसरातील खाणीतून काढलेल्या सुमारे पाच हजार फूट रनिंग दगडाचा वापरसुशोभीकरणासाठी दहा लाख खर्च, याशिवाय पुतळ्याभोवती कारंजा व बागेसाठी आणखी पाच लाख देण्याचे महापालिकेचे आश्वासनदगडांचे घडकाम ९० टक्के पूर्णकठड्यासाठी ‘कारनेस गलथा’ दगडांचा वापरऐतिहासिक दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण लवकरच पूर्ण होणार आहे. या कामासाठी आतापर्यंत दहा लाखांचा निधी खर्च झाला असून, आणखी निधी देण्याचे महापालिका आयुक्तांनी मान्य केले आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक परिसर पुन्हा एकदा नव्या रूपात करवीरवासीयांबरोबर बाहेरील पर्यटकांना भुरळ घालील.- रमेश पोवार, नगरसेवक कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर सुशोभीकरणात महत्त्वाचे काम असलेले दगडांचे घडकाम करण्याचे काम मशीनद्वारे स्थानिक पाथरवट युद्धपातळीवर करीत आहेत.
शाहू पुतळा परिसर सुशोभीकरण पूर्णत्वाकडे
By admin | Published: November 07, 2014 12:20 AM