कागल : रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यासाठी यापुढे सेंद्रिय खतांचा वापर अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची ही गरज ओळखून शाहू साखर कारखान्याने शेती विभागाच्या देखरेखीखाली शाहू समृद्ध सेंद्रिय खत तयार केले आहे. जमिनीचा पोत सुधारून उत्पादन वाढीसाठी हे खत शेतकऱ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
कोविड पाश्वभूमीवर कारखान्याचे मुख्य कार्यालयात समरजित घाटगे यांच्या हस्ते शाहू सेंद्रिय खताचा विक्री शुभारंभ पार पडला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, युवराज पाटील, बॉबी माने, सचिन मगदूम, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, शेती अधिकारी रमेश गंगाई यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी के. बी. पाटील यांनी तर आभार बाजीराव पाटील यांनी मानले.
२४ शाहू सेंद्रिय खत
छायाचित्र -
कागल येथे श्री छत्रपती शाहू साखर कारखाना उत्पादित शाहू समृद्ध सेंद्रिय खत विक्री शुभारंभ समरजित घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अमरसिंह घोरपडे, वीरकुमार पाटील जितेंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.