कोल्हापूर : कोणत्याही व्यवस्थेतील सुधारणेसाठी प्रसारमाध्यमांनी कान टोचणे आवश्यक आहे. ती भूमिका बजाविण्यात ह्यलोकमतह्ण अग्रस्थानी आहे. प्रशासन, शिक्षण, आदी विविध क्षेत्रांमध्ये विधायक दिशा देण्याचे काम करणारा ह्यलोकमतह्ण आमच्यासाठी अविभाज्य घटक बनला आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी गुरूवारी येथे केले.वाचकांसाठी नव्या अनुभवांचे दार उघडणाऱ्या लोकमतच्या दीपोत्सव या दिवाळी अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे आणि कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते लोकमतच्या शहर कार्यालयात झाले. लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकंरद देशमुख यांनी स्वागत केले. संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. समाजाचे प्रश्न, समस्या समजून घेवून ते सोडविण्याची लोकमतची भूमिका आहे. जे चांगले आहे. त्यास बळ देणे आणि चुकीचे घडत असेल, तर प्रहार करणे ही लोकमतच्या पत्रकारितेची दिशा असल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, पोलीस हा समाजाचा घटक आहे. पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. विविध स्वरूपातील कारवाईबाबत समाजाच्या जशा पोलीसांकडून अपेक्षा आहेत. तसाच समाजानेही कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.शिवाजी विद्यापीठाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ह्यलोकमतह्णने बळ दिले आहे. कुलगुरूपदाच्या जबाबदारीचे जाणीवही करून दिली. कोल्हापूरचे पहिले कुलगुरू होण्याचा मान मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. कोल्हापूरला साजेशे काम करीन, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिली. यावेळी ह्यलोकमतह्णचे जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्र्वास पाटील उपस्थित होते.आशय संपन्न लोकमत-दीपोत्सवआशय संपन्न असणारा लोकमत-दीपोत्सव हा दिवाळी अंकांमध्ये अव्वलस्थानी आहे. संपादन, मांडणी, गुणवत्ता उच्च प्रतीची, तर छायाचित्रे बोलकी आहेत. त्यामध्ये विविध विषयांची मांडणी केली आहे. लोकमत-दीपोत्सव दरवर्षी एक वेगळा, नवा अनुभव देत असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
शैलेश बलकवडे, डी. टी. शिर्के यांच्या हस्ते लोकमत-दीपोत्सवचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 4:08 PM
diwali, kolhapurnews, lokmatevent वाचकांसाठी नव्या अनुभवांचे दार उघडणाऱ्या लोकमतच्या दीपोत्सव या दिवाळी अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे आणि कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते लोकमतच्या कोल्हापूर शहर कार्यालयात झाले.
ठळक मुद्देशैलेश बलकवडे, डी. टी. शिर्के यांच्या हस्ते लोकमत-दीपोत्सवचे प्रकाशनव्यवस्थेतील सुधारणेसाठी माध्यमांनी कान टोचणे आवश्यक