छत्रपती शाहू महाराज यांच्या कन्या आक्कासाहेब महाराज यांच्यासमवेत त्यांचे राजवाड्यात बालपण गेले. त्यांचे पुणे येथे कॉन्व्हेंट इंग्रजी शाळेत शिक्षण झाले होते. त्या इंग्रजी विषयाच्या अध्यापिका म्हणून मौनी विद्यापीठात शाहू कुमार भवन माध्यमिक शाळेत शिकवत होत्या. त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंडे, असा परिवार आहे. गुरुवारी त्यांच्या निधनाबद्दल पतसंस्थेच्या सभागृहात शोकसभा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्राचार्य बी.एस. माने, प्रा. आनंद चव्हाण, इंजिनिअर नंदकुमार मोरे, आनंदराव देसाई, दीपक शहा, टी.बी. पाटील, मारुती टिपुगडे, शाहू कुमार भवन माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.एस. मोरुस्कर, पतसंस्थेच्या उपाध्यक्षा शालिनी कल्याणकर यांनी श्रद्धांजलीपर भाषणे केली. यावेळी पतसंस्थेच्या संचालिका, माजी जि.प. सदस्या नयना कलकुटकी, मंगल भराडे, सुजाता कासार, मुख्याध्यापक डॉ. एस.बी. शिंदे आदींची उपस्थिती होती.
फोटो १३ शैलजा कारखानीस