शिवाजी सावंतगारगोटी: शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास प्रसंगी नेत्यांशी दोन हात करायला इथला शेतकरी मागेपुढे पाहणार नाही असा गर्भित इशारा कॉ.सम्राट मोरे यांनी दिला. ते गारगोटी येथील क्रांती चौकात आज, बुधवारी आयोजित केलेल्या आत्मक्लेश आंदोलनात बोलत होते. यावेळी विजय देवणे, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, राहुल देसाई, कॉ. संपत देसाई आदी. उपस्थितीत होते.नागपूर गोवा महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने भुदरगड येथील महामार्ग बाधीत शेतकरी उपस्थित होते.आत्मक्लेश आंदोलनाचे संयोजन कॉ. सम्राट मोरे, सरपंच सर्जेराव देसाई यांनी केले होते. उबाठाचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांचा समाचार घेतला. आपले घर सांभाळण्याचा सल्ला दिला.
तुम्हीच रद्द करण्यासाठी किती पैसे घेता ? ते बोला!माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, आम्हाला पैसे कसले देता, याउलट तुम्हीच रद्द करण्यासाठी किती पैसे घेता ? ते बोला!. माजी आमदार केपी पाटील महामार्गाच्या समर्थकांचा बोलविता धनी कोण आहे? हे तपासावे लागेल. कोणत्या लोकप्रतिनिधींनी याला पाठिंबा दिला आहे ते मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर करावे असे आवाहन केले.
शेतकऱ्यांची आत्मबलिदानाची तयारीयुवक नेते राहुल देसाई यांनी शक्तीपीठ महामार्ग भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचे सांगितले. याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला. कॉ.संपत देसाई यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी प्रसंगी आत्मबलिदानाची शेतकऱ्यांची तयारी असल्याचे सांगितले. कॉ.शिवाजीराव मगदूम यांनी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्यांचा आक्रमकपणे समाचार घेतला.या आंदोलनाला आनंदा पाटील, उदय देसाई, मायकल बारदेसकर, राजेंद्र देसाई, राजू चौगुले, अभिजीत पाटील, सरपंच मदन पाटील, सरपंच बापूसो आरडे, सरपंच ऋषिकेश पाटील, सरपंच प्रकाश वास्कर, जालिंदर कांबळे, शशिकांत वाघरे यांच्यासह शेतकरी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.