कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शक्तिपीठ मार्गाची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. विरोधी पक्ष या महामार्गाविरोधात आंदोलन करीत आहेत. आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, शासकीय पातळीवर मंत्री म्हणून शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पत्रकारांशी बोलताना दिले.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजप हा साहजिकच मोठा पक्ष आहे. त्यांना जास्त जागा मिळतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या ज्या जागा आहेत त्या त्यांना मिळणारच आहेत. इतर ठिकाणी निवडून येण्याची क्षमता विचारात घेऊन चर्चा होऊन जागावाटप होईल. निवडणुकीच्या पूर्वी अशा चर्चा होत असतात.
कांद्याचा भाव, मराठा आणि इतर समाजाचे आरक्षण या विविध प्रश्नांमुळे राज्यात आम्हाला लोकसभेसाठी कमी मतदान झाले हे खरे आहे, असेही मंत्री हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.
उत्तर प्रदेशात काय अजित पवार गेले होते का..?
आरएसएसने अजित पवार यांच्यामुळे कमी मते मिळाल्याचे सांगितले. त्यावर कालच भुजबळ यांनी उत्तर दिले आहे.
• उत्तर प्रदेशमध्ये अजित पवार गेले नव्हते, एकंदरीत देशात जी परिस्थिती झाली आहे ती मान्यमोठा पक्ष आहे. त्यांना जास्त जागा मिळतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या ज्या जागा आहेत त्या त्यांना मिळणारच आहेत. इतर ठिकाणी करून विधानसभेत आपण दुरुस्त केले पाहिजे.
• कोल्हापूरमध्ये विजय मिळविल्यानंतर तो लोकांमुळे आणि हातकणंगलेमध्ये पराभव झाला तो धनशक्तीमुळे, असे विरोधक म्हणतच असतात, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
कागलमुळे पराभव ते कसे म्हणतील?
कागलमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्याचे भाजपच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याकडे लक्ष वेधल्यानंतर मुश्रीफ म्हणाले, पाटील यांनी कागलबाबत काय म्हटले आहे, मला माहिती नाही. मात्र, कागलमुळे पराभव झाला हे ते कसे म्हणतील?