हलकर्णी परिसरात शाळू पिकाला फटका
हलकर्णी : सोयाबीन काढणीनंतर पेरणी केलेल्या ज्वारी पिकाला हलकर्णी परिसरात फटका बसला आहे.
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे जमिनीमध्ये पेरणीसाठी घात नसल्याने उशिरा पेरण्या झाल्या. पेरणीनंतर ज्वारींची उगवण जोमाने झाली.
काही दिवसांनंतर जमिनीतील ओलावा कमी झाल्याने आणि पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याने पिकाची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पाण्याअभावी ज्वारी वाळू लागली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
------------------------
फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) परिसरात पाण्याअभावी वाळणारे ज्वारी पीक.
क्रमांक : ०४१२२०२०-गड-०९