येथील शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये संस्थापक अध्यक्ष रियाज शमनजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे होते. पहिल्या दिवशी लहान मुलांसाठी नेत्रतपासणी शिबिर पार पडले. डॉ. आंबोळे म्हणाले, शमनजी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गडहिंग्लज परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांना आपले सर्वतोपरी सहकार्य राहील. कार्यक्रमास सचिव लक्ष्मण कंग्राळकर, खजिनदार सुलोचना रेडेकर, शिवसेनेचे भरत जाधव, प्राचार्य डॉ. बापूराव चोपडे, डॉ. अस्मिता पाटणे, डॉ. अमित चव्हाण, डॉ. सिमरनजीत अवलाख, डॉ. सुजित काशिद, डॉ. अलमास सय्यद, डॉ. बिबीफातीमा पटेल, युनूस नणदीकर, अमन मुल्ला, मुस्ताक मुल्ला, पूजा वाघराळकर, आदींसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शमनजी यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा व सामाजिक उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी एम. के. सुतार यांचेही भाषण झाले. प्राचार्य अमर पाटील यांनी आभार मानले.
................
आज सर्वरोग निदान शिबिर
आज (बुधवारी) गडहिंग्लज येथील आंबेडकर भवनमध्ये सकाळी १० ते ३ यावेळेत नेत्रतपासणी, हृदयरोग तपासणी व मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे. यावेळी डॉ. उल्का गोरूले, डॉ. सुजित काशिद, डॉ. श्रीधर बेली, डॉ. संग्राम गावडे, डॉ. सोनाली रणदिवे हे रूग्णांची तपासणी करणार आहेत.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन डॉ. सदानंद पाटणे यांच्या हस्ते झाले. यावेळी रियाज शमनजी, डॉ. दिलीप आंबोळे, लक्ष्मण कंग्राळकर, एम. के. सुतार आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०७०९२०२१-गड-१४