कोल्हापूर : संभाजीनगर येथील शंभूराज शिवराज पाटील भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी रुजू झाले. त्यांची लेह लडाख येथे नियुक्ती केली आहे. त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू होते. त्याचा नुकताच संभाजीनगर फुटबॉल क्लबतर्फे सत्कार करण्यात आला.शंभूराज यांचे शालेय शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्यानंतर ते शासकीय सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्थेत (एसपीआय) रुजू झाले. त्यानंतर केआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. तो पहिल्याच प्रयत्नात २०२३ मध्ये उत्तीर्ण झाले. डिसेंबर २०२३ पासून चेन्नईत प्रशिक्षण सुरू होते.हा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची सप्टेंबर महिन्यात लेह लडाखमध्ये लेफ्टनंटपदी नियुक्ती करण्यात आली. शंभूराज यांचे वडील पुणे येथील एका कंपनीत सहायक सरव्यवस्थापक आहेत, तर आई डॉक्टर आहे. पाटील कुटुंबीय मूळचे कोल्हापूरचे आहेत. कामानिमित्त ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत.
कोल्हापुरातील शंभूराज पाटील भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 2:03 PM