शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

Kolhapur: इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन बँकेत साडेतीन कोटींचा अपहार, अध्यक्षासह चौदाजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 3:46 PM

स्वत: अध्यक्ष व त्यांच्या पत्नी यांच्या नावे नियमबाह्य कर्ज देणे अशी अनेक नियमबाह्य कामे केल्याचे आढळले

अतुल आंबीइचलकरंजी : येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बॅँकेत पदाचा दुरूपयोग करत नियमबाह्य कर्ज वाटप करून तब्बल तीन कोटी ५८ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष, त्याची पत्नी व शाखाधिकारी, आदींसह १९ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी  प्रशासक धोंडीराम आकाराम चौगुले (रा. राजारामपुरी कोल्हापूर) यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी अध्यक्ष प्रकाश शंकरराव पुजारी याच्यासह चौदाजणांना अटक केली आहे.अध्यक्ष प्रकाश व त्यांची पत्नी कांचन (दोघे रा. आवाडे अपार्टमेंट मागे), शाखाधिकारी मलकारी लवटे (रा. धनगर गल्ली, गावभाग), कर्ज विभागप्रमुख राजेंद्र गणपती जाधव (रा. सांगली नाका), सिनियर मॅनेजर रावसाहेब महादेव जावळे (रा. राजेंद्रनगर कोल्हापूर), शाखाधिकारी राजेंद्र जयपाल मौर्य (रा. सांगली नाका), पासिंग आॅफिसर सुरेखा जयपाल बडबडे (रा. बिग बाजारजवळ), ज्युनिअर आॅफिसर मारुती कोंडीबा अनुसे (रा. माले मुडशिंगी), शिपाई अभिजित मल्हारी सोलगे (रा. माणगांवकर बोळ), कॅशियर वैभव बाळगोंडा गवळी (रा. बरगे मळा), क्लार्क निलेश शिवाजी दळवी (रा. लिगाडे मळा),कॅशियर रोहित बळवंत कवठेकर (रा. निंबळक ता. तासगांव), क्लार्क सजेर्राव महादेव जगताप (रा. येडेमच्छिंद्र जि. सांगली), आयटी मॅनेजर शेखर नारायण खरात (रा. सांगलीवाडी),  शाखाधिकारी प्रभाकर बाजीराव कदम (रा. पलूस ता. सांगली), शाखाधिकारी राहुल प्रकाश पाटील (रा. जयसिंगपूर), शाखाधिकारी विकास वसंत साळुंखे (रा. राजाराम ता. तासगांव), क्लार्क सारीका निलेश कडतारे (रा. सरनोबतवाडी), शिपाई विजय परशराम माळी (रा. ढोरवेस तालीम), सुरेखा बडबडे, सजेराव जगताप, राहुल पाटील, सारीका कडतारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.अपहाराबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रशासक चौगुले यांनी बॅँकेच्या सन २०२०-२१ आणि सन २०२१-२२ सालाचे लेखापरीक्षण केले. त्यामध्ये बॅँकेमध्ये कर्जाची थकबाकी असताना पदाचा गैरवापर करत संचालक मंडळाची परवानगी न घेता नियमबाह्यपणे कर्ज वाटप केले. त्यामध्ये खाते बनावट निरंक दाखले देणे, ते खरे म्हणून वापरणे, कर्जाला बेकायदेशीर सूट देणे, बनावट व्हौचर देणे, नातेवाइकांना कर्ज देणे, स्वत: अध्यक्ष व त्यांच्या पत्नी यांच्या नावे नियमबाह्य कर्ज देणे अशी अनेक नियमबाह्य कामे केल्याचे आढळले आहे. त्या माध्यमातून सन २०२०-२१ मध्ये एक कोटी ५० लाख ३७ हजार आणि सन २०२१-२२ मध्ये दोन कोटी ७ लाख ९८ हजार असा एकूण तीन कोटी ५८ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केला. तसेच हा प्रकार मुख्य शाखा, सहकारनगर, पलूस आणि इस्लामपूर शाखेत घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस