‘मेडिकल कॉलेज’च्या २१ मजली इमारतीचा संकल्प
डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून विकासाची नवी पाऊले मी नेहमी टाकत आलो आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज, हॉस्पिटल, सयाजी हॉटेल, कृषी विद्यापीठ, आदींचा त्यात समावेश आहे. आता डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल परिसरातील गजानन महाराज यांच्या मंदिरालगत मेडिकल कॉलेजची २१ मजली अद्ययावत इमारत तीन वर्षांत साकारण्याचा संकल्प या स्थापनादिनी करत आहे. या इमारतीमधील अकरा मजले कॉलेजसाठी, तर उर्वरित मजल्यावर मुला-मुलींचे वसतिगृह, प्रशासनाचे कार्यालय असेल. जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर या इमारतीचे काम सुरू करण्यात येईल, असे कुलपती डॉ. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, हॉस्पिटलच्या ‘एचएमआयएस’ या संगणक प्रणालीचे अनावरण करण्यात आले. सकाळी कॉलेजच्या परिसरात जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
चौकट
प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
डॉ. विश्वनाथ भोसले (डॉ. डी. वाय. पाटील आऊटस्टँडिंग ॲडमिनिस्ट्रेटर अवॉर्ड). शाम कोले (डॉ. डी. वाय. पाटील कार्यरत्न पुरस्कार), डॉ. सी. डी. लोखंडे (विज्ञानचार्य अवॉर्ड), डॉ. उमाकांत पाटील (बेस्ट रिसर्चर अवॉर्ड), डॉ. सुनीता तिवले, अनिल कुरणे, कल्पना कुलकर्णी, मानसिंगराव घाटगे (बेस्ट टीचर अवॉर्ड), सुरेश खोपडे, आनंदराव बंडगर, जीवन पाटील, आनंदा पाटील, प्रफुल्ल मिरजकर, आशालता चोपडे, दिलीप चव्हाण, मोहन हातकर, बाबूराव गुरव (सौ. शांतादेवी डी. पाटील बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड). प्राची कवाळे (क्रिएटिव्ह टॅगलाईन स्पर्धा विजेत्या). अजित पाटील, सुषमा जोटकर, राजेंद्र माने, सुरूची पवार, विश्वशांती व्हटकर, प्रीती कांबळे, अर्चिता पाटील, दीपक सावंत, कविता कद्रे, ऊर्मिला खारकर, निखिल पेटकर, विनोद हेरालगे, अमोल उलपे, अमोल खाबिया, सुनील कुडाळे, विनोद धनवडे, वैशाली गायकवाड, राकेशकुमार शर्मा (कोविड योद्धा) यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याने प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी भारावून गेले.
फोटो (०१०९२०२१-कोल-जे एफ पाटील पुरस्कार, ०१) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १६ व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी डावीकडून शिम्पा शर्मा, पृथ्वीराज पाटील, डॉ. संजय डी. पाटील, राकेशकुमार मुदगल, राकेशकुमार शर्मा, कमल पाटील उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०१०९२०२१-कोल-डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी कार्यक्रम ) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १६ व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)