कोल्हापूर : राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी या वयात लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी अपेक्षा होती. तरीही त्यांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु त्यांना इतिहासात पहिल्यांदाच हरावे लागणार आहे, असा भाकित महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच आपण शिवसेना-भाजप युतीशी कधीही प्रतारणा केली नसून, यापुढेही करणार नाही, त्यामुळे कोणीही शंका बाळगू नये, असे स्पष्टीकरणही त्यांनी रविवारी दिले.शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती महापौर सरिता मोरे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, माजी नगरसेवक सुनील मोदी, आदींची होती.मंत्री पाटील म्हणाले, माझे व उद्धव ठाकरे यांचे गेल्या ३५ वर्षांपासून घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील होतो. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही कॉँग्रेससोबत जाण्याचा विचार करू शकले नसते. त्यांचेच रक्त उद्धव ठाकरे यांच्यात आहे. त्यामुळे युतीवर शिक्कामोर्तब झाले. अनेकांकडून युती होणार नाही असे छातीठोकपणे सांगितले जात होते; परंतु युतीबाबत आपण पहिल्यापासून निश्चिंत होतो.माढा, बारामतीसह सर्वच जागा जिंकूभाजप-शिवसेना ४३ नव्हे तर सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकेल. यामध्ये शरद पवारांचा माढा मतदार संघ व बारामती मतदार संघही असेल, असे महसूलमंत्री पाटील सांगितले.
शरद पवारांना इतिहासात पहिल्यांदाच हरावे लागेल : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:17 PM