कोल्हापूर : मामाचा गाव म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे तरी याला कसे अपवाद असतील? म्हणूनच पवार हे १० जानेवारीला पन्हाळा तालुक्यातील गोळीवडे या आपल्या मामाच्या गावाला आवर्जून भेट देणार आहेत.कोल्हापूरकरांवरही पवार कुटुंबीयांनी मनापासून प्रेम केले आणि पवार यांनीही कोल्हापूरच्या विकासासाठी भरभरून दिले. पन्हाळा तालुक्यातील गोळीवडेसारख्या छोट्या गावात भोसले कुटुंबीयांत त्यांच्या आई शारदातार्इंचा जन्म झाला होता. ते आजोळी गोळीवडेला कधी गेले नाहीत. पवार ९ जानेवारीला राजर्षी शाहू महाराजांच्या समाधिस्थळाच्या उद्घाटनासाठी कोल्हापूरच्या दौºयावर येणार आहेत. दुसºया दिवशी म्हणजे १० जानेवारीला सकाळी ते गोळीवडे येथे भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. एकंदरीतच, शरद पवार यांच्या या दौºयाने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार असून, गोळीवडे ग्रामस्थांची गेले अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे.
शरद पवार जाणार मामाच्या गावाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 5:05 AM