कोल्हापूर : शेतकºयांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी त्याच्या घामाची किंमत द्यावी लागेल. यासाठी केवळ सरकार पुरेसे पडणार नसून, सहकाराचा मंत्रच त्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.गुरुवारी संध्याकाळी हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, कर्नाटकचे सहकारमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या शानदार समारंभात पवार यांच्या हस्ते कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा सपत्निक भावपूर्ण सत्कार करण्यात आला.या कारखान्याच्या स्थापनेसाठी ज्या पवार यांनी मोठी मदत केली, त्यांच्या हस्ते पहिल्या गळिताचा शुभारंभ झाला, त्याच पवार यांच्या उपस्थितीत रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम होत असल्याने एकूणच जल्लोषी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामध्ये सर्वच वक्त्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कार्याचा गौरव केला.
शरद पवार म्हणाले, आजचा हा दिवस कारखान्यासाठी ऐतिहासिक आहे. आवाडे यांची कारखाना काढण्याची इच्छा होती; परंतु पैसे नव्हते. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना राज्यातील चार-पाच खासगी कारखाने सहकारात आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यातील पहिला कारखाना म्हणजे जवाहर कारखाना होय.याच परिसरातील सा. रे. पाटील यांच्या कारखान्यावर झालेल्या राज्यातील सर्व कारखान्यांच्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांच्या बैठकीत केवळ साखर घेऊन थांबून चालणार नाही, अन्य उत्पादने घेतली पाहिजेत, असा विचार पुढे आला. हाच धागा पकडून कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी राज्यातील पहिला वीज प्रकल्प उभा केला.
पवार पुढे म्हणाले, आपल्या देशातील नागरिकांची भुकेची गरज भागविण्यासाठी कुणाच्या दारात वाडगा घेऊन जायला लागू नये यासाठी १० वर्षे कृषिमंत्री असताना काम केले. म्हणून अनेक बाबतींत धान्य आयात करावे लागण्याची परिस्थिती बदलली आहे. आता भारत भात, गहू आणि साखर निर्यात करीत आहे. हे सर्व बदलाचे चित्र शेतकºयांच्या कष्टातून निर्माण झाले आहे. म्हणूनच त्याच्या घामाची किंमत देण्याची भूमिका घेतली गेली पाहिजे.
महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, एकीकडे एफआरपी देणे, ७० आणि ३० टक्क्यांचा फॉर्म्युला बंधनकारक असताना, उसाला दर मिळाला पाहिजे यासाठीच शासन सर्व ते काही करीत असताना पुन्हा ही तोडफोड कशासाठी? कारखानदारांनी एकत्र बसून कारखानेही नीट चालावेत आणि शेतकºयांनाही चांगला दर मिळावा, अशी भूमिका घेतली जावी. त्याला सरकारचा पाठिंबा असेल.आम्ही सहकार मोडू असे सांगितले गेले. मात्र गेल्या तीन वर्षांत एफआरपी मिळेल असा प्रयत्न केला. साखरेचे दर खाली गेल्यानंतर ११०० कोटींचे व्याज दिले. एक दिवस जरी कारखाना बंद राहिला तरी प्रचंड नुकसान होते. तुमचा कारखाना मोठा आहे. तुम्हीच पुढाकार घ्या आणि या सगळ्या कारखानदारांना जेवण घालून तुम्हीच तोडगा काढून विषय संपवा, असे आवाहन पाटील यांनी प्रकाश आवाडे यांना केले.
सत्काराला उत्तर देताना कल्लापाण्णा आवाडे म्हणाले, आयुष्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील आणि शरद पवार यांनी जे जे काही सांगितलं, ते ते आम्ही करत गेलो. पवारांच्याच मार्गदर्शनाखाली आमची जडणघडण झाली. माझ्यानंतर प्रकाशरावांनाही त्यांनी दिशा दिली. सर्व संस्थांची उभारणी करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे सहकार्य मिळाले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आहे. यावेळी आवाडे यांच्यासह अण्णासो देशपांडे आणि भागाजे या शेतकºयांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचा पवार व मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील व कर्नाटकचे सहकारमंत्री रमेश जारकीहोळी यांचेही यावेळी भाषण झाले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांनी आभार मानले.यावेळी माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार प्रकाश हुक्कीरे, खासदार प्रभाकर कोरे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, भरमूआण्णा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, संध्याताई कुपेकर, अमल महाडिक, गणेश हुक्कीरे, माजी आमदार के. पी. पाटील, काका पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना गाठ, डी. सी. पाटील, संजय मंडलिक, ए. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.प्रकाश आवाडेंना भाजपची आॅफरचंद्रकांतदादा पाटील म्हणाले, गेले आठवडाभर सगळीकडे या कार्यक्रमाचे फ्लेक्स पाहतोय. हे शक्तिप्रदर्शन कशासाठी? आवाडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार की भाजपमध्ये असा प्रश्न मला पडला; पण प्रकाश आवाडे बोलताना पवार आणि माझ्याकडे हात करून बोलत होते. आवाडे, तुम्ही आमच्यात आलात तर आवडेल. आम्ही खूप सन्मान देतो. आमच्यात आलेल्या कुणालाही आतापर्यंत पश्चात्तापझालेला नाही.मग त्या सदा खोतांचे काय होणार...?आवाडे, आता तुम्ही आणि राजू शेट्टी एकत्र यायचे म्हणत आहात तर मग त्या सदा खोतांचे काय होणार, अशी मिश्कील विचारणा शरद पवारयांनी केली. यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी उसाच्या पहिल्या उचलीच्या आंदोलनात आम्ही खासदार शेट्टी यांच्यासमवेत असल्याचे जाहीर केले. त्याचा संदर्भ घेत पवार म्हणाले. ‘महाराष्ट्रात साखर हंगाम सुरू झाला की एका कोपºयात दरवर्षी काहीतरी गडबड सुरू होते.हा कोपरा इचलकरंजीचा असतो.ऊसदरासाठी संघर्ष करतो म्हणून या परिसराने शेट्टी यांना खासदार म्हणून निवडून दिले. त्यांनी खासदार म्हणूनही त्यासंबंधी भूमिका मांडली. त्यामुळे मला यामागे संघर्षाची भूमिका आहे असे वाटे; परंतु आज वेगळीच गडबड अनुभवास आली.