निपाणी : निपाणी मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवार शशिकला ज्वोल्ले यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. काका पाटील यांचा त्यांनी आठ हजार ५७६ च्या मताधिक्याने पराभव केला.
निपाणी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील व शशिकला ज्वोल्ले यांच्यात चुरशीची लढत झाली. बेळगावहून ज्वोल्ले यांच्या मताधिक्याचे आकडे जसजसे कळत होते, तसतसे कार्यकर्ते मोठा जल्लोष करीत होते. दुपारी दोनच्या सुमारास ज्वोल्ले यांचा विजय निश्चित झाल्यानंतर निपाणीत कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवरून रॅली काढून गुलालाची उधळण केली. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये युवकांनी आनंदोत्सव साजरा केला. शशिकला ज्वोल्ले बेळगावहून निपाणीमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
त्यानंतर त्यांच्या विजयी मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिवाजी चौकात जाऊन ज्वोल्ले यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पुढे ही मिरवणूक जुना पी.बी. रोड, नगरपालिका मार्ग, जुना मोटार स्टॅण्डमार्गे कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे आल्यावर मिरवणुकीची सांगता झाली. अण्णासाहेब ज्वोल्ले, ज्योतिप्रसाद ज्वोल्ले, निपाणी शहर भाजप अध्यक्ष जयवंत भाटले, भरत चव्हाण, संजय शिंत्रे, राज पठाण, प्रवीण भाटले, आदी उपस्थित होते.
कर्नाटकमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर ही गेल्या ३५ वर्षांची परंपरा आहे. कितीही मोठा सत्ताधारी पक्ष असला तरी त्याचा सहजरीत्या पराभव होतो, असे असताना भाजपला सहजरीत्या विजय मिळणे अपेक्षित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभेच्या प्रचारात उतरूनही या पक्षाला बहुमत गाठता आले नाही, याबद्दल भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.- राजू शेट्टी, खासदार.’’कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकारने गेल्या पाच वर्षांत लोककल्याणाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. धर्मनिरपेक्ष शक्तींना सत्तेवर आणण्यासाठी ३८ टक्के लोकांनी कॉँंग्रेसला मतदान केले. कॉँंग्रेसला आत्मचिंतन करावे लागेल. तथापि, कॉँंग्रेसचाच मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये असेल, अशी आशा आहे. अनेक जागांवर कॉँंग्रेस आणि भाजपमध्ये अत्यंत कमी मतांचा फरक आहे. त्यामुळे हा पराभव म्हणता येणार नाही.- धनंजय महाडिक, खासदार.’’निकालानंतर कॉँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येऊन धर्मनिरपेक्ष मुख्यमंत्री होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा संपूर्ण देशासाठी एक चांगला संदेश आहे. या निमित्ताने लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत.- हसन मुश्रीफ, आमदार.कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भाजपने जातींचे ध्रुवीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मूळ मुद्द्यांना बगल देऊन वेगळ्या मुद्द्यांवर प्रचार केला. त्यांनी जातीयवाद करून मते मिळविण्याचा प्रयत्न केला. भाजपने खोटे मुद्दे मांडून काँग्रेसविरोधात नकारात्मकता निर्माण केली. भाजपचा विजय हा तांत्रिक स्वरूपातील आहे. या निवडणुकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कष्ट केले त्यामुळे अधिक मतदान झाले आहे.- सतेज पाटील, आमदार.’’पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा व पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम व संघटनात्मक काम यामुळेच भाजपला पहिल्या क्रमांकाचे यश मिळाले आहे. आठ दिवसांत भाजप बहुमत सिद्ध करून येडीयुरप्पा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास आहे.- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती.’’निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली त्याबद्दल अभिनंदन. मात्र, महाराष्टÑ विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेची गरज लागणार आहे. केंद्रातील सत्ता आणि निवडणुकीसाठी त्यांनी वापरलेला पैसा यामुळे भाजपला हे यश गाठता आले. महाराष्टÑात शिवसेनेची ताकद ही भाजपपेक्षा जास्त असल्याने युतीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणती भूमिका घेतील, त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.- राजेश क्षीरसागर, आमदार.निपाणी मतदारसंघात सलग दुसºयांदा विजयी झालेल्या भाजपच्या आमदार शशिकला ज्वोल्ले यांच्या विजयाचा आनंदोत्सव भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला.