शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

लग्नानंतरही तिने पटकाविली तीन सुवर्णपदके

By admin | Published: November 23, 2014 12:41 AM

नाशिक येथे झालेल्या क्रीडा महोत्सवात स्वाती पाटील-जाधवचे यश

एकनाथ पाटील / कोल्हापूर विद्यार्थिदशेपासूनच खेळाची आवड... लग्नानंतर खेळाला ‘ब्रेक’ लागेल अशी शंका मनात होती; परंतु पती सागर यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे चार व दीड वर्षाच्या दोन मुलींना घरामध्ये ठेवून तिने थेट नाशिक गाठले. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर स्वाती पाटील-जाधवने मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवात तीन सुवर्णपदके पटकावून विवाहित महिला खेळाडूंना एक नवी प्रेरणा देत खेळासोबत आपली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. देशात क्रीडा क्षेत्रात महिलांची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. महाराष्ट्राचा विचार करता धावपटू कविता राऊत, राही सरनोबत, आदी खेळाडूंनी राज्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. स्वाती पाटील-जाधव यांचे माहेर शिंगणापूर (ता. करवीर). लग्नानंतर त्या सासरी कोल्हापुरात राहू लागल्या. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कोल्हापूरमधील केंद्र असलेल्या डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयात कला शाखेतील पदवीच्या तृतीय वर्षात त्या शिकत आहेत. पती सागर जाधव हे स्वत:चा व्यवसाय करतात. त्यांना चार वर्षांची निहारिका आणि दीड वर्षाची रणविता या दोन मुली आहेत. या तिघांच्या सहकार्याने त्या स्पर्धेत सहभागी झाल्या. संसाराचा भार सांभाळत सकाळी सात ते दहा मैदानावर धावणे, उंचउडी, लांबउडी याचा त्या कसून सराव करतात. निहारिकाला त्या मैदानावर घेऊन जातात. दीड वर्षाच्या रणविताला सांभाळण्याचे कार्य आई-वडिलांसह बहिणीने स्वीकारल्यामुळे त्यांना रोजचा स्पर्धेचा सराव करणे शक्य झाले. सध्या त्या पदवीच्या शेवटच्या वर्षात असल्यामुळे त्यांनी खेळासोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला आहे. त्यासाठीच्या योग्य मार्गदर्शनासाठी त्यांनी खासगी क्लासेसही सुरू केले आहेत. मनात इच्छा असेल तर आयुष्यात कोणतीच गोष्ट मला अशक्य वाटत नाही; कारण लग्नानंतर माझ्या खेळाला ब्रेक लागेल, अशी शंका मनात होती. पती सागर यांच्याशी मी या विषयावर मनमोकळा संवाद साधला. त्यांनीदेखील माझ्यावर विश्वास दाखविला. अर्थात या विश्वासाला तडा न देण्याची तयारी मी प्रथमत: दाखविल्याने ते शक्य झाले. मला आयुष्यात यश मिळवायचेच आहे. त्यासाठी कठोर मेहनत करण्याची मनाशी खूणगाठ बांधली आहे. क्रीडागटातून पीएसआय, डीवायएसपी होण्यासाठी अभ्यास सुरू आहे. त्या दृष्टीने दिनक्रम ठरवून त्यात स्वत:ला बांधून घेतले आहे. या शिस्तीचा आज मला फायदा झाला. केंद्रीय क्रीडा महोत्सवात लांबउडी, ८०० मीटर धावणे व १०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणे शक्य झाले. या विजयाचे श्रेय महाविद्यालयातील प्राचार्य, क्रीडाशिक्षक इम्तियाज शेख यांच्यासह पती सागर व माझ्या दोन मुलींनादेखील जाते. त्यांनी सोबत येण्याचा हट्ट धरला असता तर कदाचित मला स्पर्धेपासून दूर राहावे लागले असते. महिलांनी स्वत:ला कमी लेखण्याचा स्वीकार केला आहे. हा दृष्टिकोन अगोदर बदलण्याची गरज असल्याचे मला वाटते. कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. त्यासाठी फक्त महत्त्वाकांक्षा असावी लागते. तीन सुवर्ण घेऊन दि. २ डिसेंबर रोजी कोल्हापूरला सन्मानाने जाणार आहे, याचा मनस्वी आनंद वाटतो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ................................ फोटो : २२११२०१४-कोल-स्वाती पाटील नावाने आहे.