वाशी : ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुणे विभागीय स्पर्धेसाठी शेळकेवाडी (ता. करवीर) गाव सज्ज झाले असून, पुन्हा गावाला गतवैभव मिळवून देण्यासाठी एकवटले आहे.ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून २००६-०७ मध्ये राजस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रथम क्रमांक पटकावला होता.संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने शेळकेवाडी (ता. करवीर) येथे सुरू असून, जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी शेळकेवाडी, निवड झाली. मूल्यमापन करण्यासाठी शुक्रवार, २७ रोजी पुणे आयुक्त व त्याची कमिटी गावाला भेट देणार आहे. गावाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी गेली दोन महिने शेकडो हात राबत आहेत.गावातील स्वच्छता मोहिमेंतर्गत ग्रामीण गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी सार्वजनिक शोषखड्डा १०० टक्के, बायोगॅस, प्लास्टिक संकलन केंद्र, शाळा, अंगणवाडीसह गावात अंतर्गत सीसीटीव्ही व्यवस्था, वॉटर एटीएम, अशा प्रकारची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. तसेच गावामध्ये उत्तम आरोग्याचा प्रचार आणि विविध उपक्रमांद्वारे तसेच घराच्या भिंतींवर काढण्यात आली आहेत.
गावानं लोकसहभागातून अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी केली असून, नवनवीन संकल्पना राबवून गावाचे वेगळेपण जपले आहे. - तेजश्री शेळके, सरपंच
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानापासून सुरू झालेली ही विकास चळवळ ग्रामस्थ व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने निर्धाराने सुरू आहे. - सुरेखा आवाड, ग्रामसेविका