गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये मृतदेह दहन करण्यासाठी शेणींचा जास्त प्रमाणात तुटवडा भासत आहे. यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस एक लाख शेणी प्रदान करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. या अंतर्गत हुपरी शहर भाजप यांच्या वतीने आज ५००० शेणी पाठवण्यात आल्या आहे.यावेळी ज्येष्ठ नेते महावीर गाट,पक्षप्रतोद रफिक मुल्ला, शहराध्यक्ष मोहन वाईंगडे,नगरसेवक सुभाष कागले,सचिन गाट,शशिकांत मधाळे,राजेंद्र साळोंखे,जिल्हा सरचिटणीस माधुरी कुरणे, अनिल सांगवडे,नितीन पाटील,राजेश नाकील, अजित पाटील,उदय शिंदे,शिवाजी भानसे, जयराज गायकवाड,प्रतिक निंबाळकर आदी उपस्थित होते.
१५ हुपरी भाजप
-
फोटो ओळी हुपरी शहर भाजपाच्या वतीने कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीस ५००० शेणी पाठवण्यात आल्या. यावेळी महावीर गाट, रफिक मुल्ला, मोहन वाईंगडे, सुभाष कागले, सचिन गाट, शशिकांत मधाळे, राजेंद्र साळोंखे, माधुरी कुरणे आदी उपस्थित होते.