कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळाच्या संघ स्थापनेपासून खेळलेल्या १०० हून अधिक माजी फुटबॉलपटूंचा उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बुधवारी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तालमीच्या या अनोख्या सन्मानाने फुटबॉलपटू चांगलेच भारावून गेले. निमित्त होते आज, गुरुवारपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू होणाऱ्या ‘सतेज चषक’ फुटबॉल स्पर्धेचे.
मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाच्या प्रांगणात हा सोहळा झाला. हे फुटबॉलपटू जेव्हा मैदानावर कर्तृत्व गाजवत होते, तेव्हा या खेळाला एवढे ग्लॅमर नव्हते. फारसे पैसेही मिळत नव्हते परंतू पेठेच्या व तालमीच्या अस्मितेसाठी त्यांनी जीवनातील कांही वर्षे या खेळासाठी दिली. अशा फुटबॉलपटूंच्या खेळाची आठवण ठेवून तालमीने त्यांचा गौरव करून वेगळीच कृतज्ञता जपली. ज्या पायाने गोल करून तालमीला विजय मिळवून दिला, ते पाय लटपटत असताना त्यांनी हा सत्कार स्विकारला.
या सोहळ्यात माजी ज्येष्ठ फुटबॉलपटू पांडबा नलवडे, जयसिंग मुळे, भीमराव चौगुले, अशोक मेस्त्री, बाळासाहेब निचिते, अशोक पाटील, संभाजी मांगुरे-पाटील, आनंदराव पााटील, अप्पा ढोणे, श्रीपाद ढेरे, भारत जगताप, अनिल मुळे, अशोक पोवार, एस. वाय. सरनाईक, किसन काटकर, प्रकाश खांडेकर, प्रकाश कटके, यशवंत साळोखे, चंदू पोवार, रावसाहेब सरनाईक, शिवाजी पाटील, राजेंद्र जाधव, प्रमोद बोडगे, शौकत महालकरी, शशिकांत पोवार, आनंदा डोणे, बापूसाहेब पाटील, इंद्रजित चव्हाण (छोट्या), सुरेश पाटील, शाम देवणे, शरद माळी, संजय खारगे, संजय जांभळे, राजू जमादार, हणमंत पाटील, विजय कदम, सुधाकर पाटील, सुनील ठोंबरे, प्रभाकर पाटील, शेखर ठोंबरे, सदा घाडगे, गिरीश शहा, संजय हंचनाळे, बाळू शिराळे, आनंदा ठोंबरे, सुरेश शिंदे, धोंडीराम कांबळे, हेमंत धर्माधिकारी, राजेंद्र पाटील (कला), रमेश घाडगे, शब्बीर नायकवडे, प्रकाश चौगुले, शरद पोवार, अनिल चोपदार, उदय साटम, प्रशांत इंगवले, अमोल आयरे, अजित माने, रवींद्र नलवडे, गजानन कु-हाडे, आशिष पोवार, उत्तम कुंभार, अमित सातार्डेकर, रणजित तिवारे, बंटी वाडकर, सुशील गायकवाड, धनंजय यादव, अमरदीप कुंडले, श्रीकांत पाटील, महेश पाटील, रतन बाणदार, उदय कांबळे, शकील मुल्ला, किरण अतिग्रे, मिथुन मगदूम, अमर वाडकर, रणवीर मेथे, हृषिकेश जठार, संग्राम पायमल, शिवप्रसाद ढेरे, अजिंक्य नलवडे, उत्सव मरळकर, नियाज पटेल, राजू घाटगे, विराज नलवडे, नामदेव देवणे, राहुल गायकवाड, संतोष तेलंग, सरदार हकीम, राजू गावडे, प्रकाश शेटे, ओम घाडगे, विजय कुंभार, युक्ती ठोंबरे, राम माळी, रोहित ठोंबरे, छोटू गुरव, रॉबील मेंडोसा, अभिजित चोरगे, मिलिंद शिंदे, संजय सासने, संजय चिले, नितीन पाटील, राहुल नलवडे, अनिल सुभेदार, शरद खोपडे, सौरभ सालपे, शरद हुकिरे, अमर भोसले, विनायक चव्हाण, नीलेश चव्हाण, अभिजित घाडगे, राजेंद्र काशीद, रमेश घाटगे, अक्षय ठोंबरे, मधू चौगले, राहुल माळी, प्रसाद कारेकर, दिलवर भोसले, महेश वस्ताद यांचा समावेश आहे.
यावेळी ज्येष्ठ कुस्ती संघटक पी. जी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, डॉ. भरत कोटकर, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष सुभाष सरनाईक, संदीप सरनाईक, संपत जाधव, श्रीनिवास जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.फुटबॉलची खाणफुटबॉलच्या वस्तादांनी तयार केलेले ‘पाटाकडील’चे अनेक खेळाडू पोलीस, लष्कर, विमा कंपनी, विद्यापीठ, कस्टम, एक्साईज, आरसीएफ, बँक आॅफ इंडिया, एअर इंडिया एवढेच काय, भारत जगताप तर न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाले. अशा एक ना अनेक आठवणींना शरद माळी, विजय देवणे यांनी उजाळा दिला.