शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

यात्रेकरुंना दिलासा... आता ते येणार स्वगृही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 1:40 PM

दि. ७ मार्च रोजी महाराष्ट्रातून सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी निघालले यात्रेकरू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांचा प्रवास अर्धवट सोडून स्वस्थळी परतत असताना (मध्यप्रदेशमधून खावासा सीमामार्गे) महाराष्ट्रात दि. २५ मार्च रोजी नागपूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र रामटेक येथे दाखल झाले.

ठळक मुद्देकारण रामटेकमध्ये अडकलेले शिखरजी यात्रेकरू घरी परतणार

कोल्हापूर : सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळे रामटेक येथे अडकलेल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील ५१ यात्रेकरू घरी परतणार आहेत. या यात्रेकरूंना स्वगृही येण्यास बुधवारी परवानगी मिळाली आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले.दि. ७ मार्च रोजी महाराष्ट्रातून सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी निघालले यात्रेकरू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांचा प्रवास अर्धवट सोडून स्वस्थळी परतत असताना (मध्यप्रदेशमधून खावासा सीमामार्गे) महाराष्ट्रात दि. २५ मार्च रोजी नागपूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र रामटेक येथे दाखल झाले.

जिल्हाबंदी असल्यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. या यात्रेकरूंनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर राज्यमंत्री यड्रावकर यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. पण जिल्हाबंदी असल्याने त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन यात्रेकरूंना स्वगृही परत आणण्यासाठी प्रयत्न केले. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस