कोल्हापूर: कोरोनाचे सावट असतानाही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत शुक्रवारी मुस्लीम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. सामूहीक नमाजपठणावर मर्यादा आल्याने घरातच खुदबा पठण करत कोरोनामुक्तीसाठी अल्लाहकडे दुआही करण्यात आली. शिरखुर्म्याचा आस्वादही कुटूंबियासमवेतच लुटला.सलग दुसऱ्या वर्षी रमजान ईद कोरोनाच्या सावटातच साजरी झाली. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीदेखील कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह हिलाल कमिटीनेही ईद साध्या पध्दतीने आणि तीही घरच्या घरीच साजरी करावी असे आवाहन केले होते. त्याचे तंतोतंत पालन करत मुस्लीम कुटूंबात ईद साजरी झाली.मुस्लीम बोडॅीग पटांगणावर सामूहीक नमाजपठण होते, पण शुक्रवारी केवळ पाचच लोकांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. मौलान मोबीन बागवान यांनी खुदबा पठण करुन कोरोनामुक्तीसाठी दुआ केली. मोहल्ल्यांमध्ये देखील असेच एकेकट्याने ईद साजरी झाली. कुटूंबिय वगळता बाहेरचे कुणीही यात सहभागी होणार नाहीत, याची दक्षताही घेतली गेली. हस्तांदोलन व गठाभेटही टाळण्याकडेच बहुतांश जणांचा कल दिसत होता. ईद निमित्त एकमेकांच्या घरी जाता येत नसल्याने फोनद्वारेच शुभेच्छा देऊन ईदचा आनंद द्वीगुणीत केला जात होता.मुस्लीम बांधवांना सर्व धर्मियासमवेत जोडून ठेवणारी कडी म्हणजे शिरखुर्मा. खास पध्दतीने बनवलेला हा पदार्थ खाण्यासाठी मुस्लीम कुटूंबामध्ये गर्दी असते, पण यावर्षी घरी बोलावता येत नसल्याची रुखरुख सलत राहिली. डबे पोहच करण्यावरही मर्यादा आल्याने यावर्षी घरातल्या घरातच सण असे या ईदला स्वरुप आल्याचे दिसले.
Ramadan - शिरखुर्मा आणि खुदबाही घरच्या घरी, कोरोनामुक्तीची अल्लाहकडे प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 6:56 PM
CoronaVirus Ramadan Kolhapur: कोरोनाचे सावट असतानाही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत शुक्रवारी मुस्लीम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. सामूहीक नमाजपठणावर मर्यादा आल्याने घरातच खुदबा पठण करत कोरोनामुक्तीसाठी अल्लाहकडे दुआही करण्यात आली. शिरखुर्म्याचा आस्वादही कुटूंबियासमवेतच लुटला.
ठळक मुद्दे शिरखुर्मा आणि खुदबाही घरच्या घरीकोरोनामुक्तीची अल्लाहकडे प्रार्थना