संदिप बावचे
शिरोळ : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला टनाला एकरकमी २९२० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शुक्रवारी केली. महापुरात बुडीत झालेल्या ऊसाला गाळपासाठी प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हंगामापूर्वीच दर जाहीर करणारा दत्त राज्यातील दुसरा कारखाना ठरला आहे.
येत्या २१ ऑक्टोबर पासून कारखाना सुरु करण्यात येणार असल्याचे सांगुन अध्यक्ष पाटील म्हणाले, कामगारांना दिवाळीला २१ टक्के बोनस एकरकमी देण्यात येणार आहे.यावर्षी साडेअकरा ते बारा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट असून १२.१० रिकव्हरी होईल असा अंदाज आहे.गेल्यावेळी ऊर्जाकुंरच्या माध्यमातून सोळा कोटी युनिट वीजनिर्मिती झाली असून त्यातील चार कोटी युनिट वापरुन उर्वरित वीज ग्रीडला दिली.शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपणे हेच दत्त कारखान्याचे ब्रीद असून सर्वांना पुढे घेऊन जाण्याची दृष्टी ठेवली आहे.